लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अलीगडला पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींनी राजा महेंद्र प्रताप सिंग यांच्या नावाने सुरू होणाऱ्या विद्यापीठाची पायाभरणी केली. अलीगडला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरची पाहणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, की आज अलीगड आणि पश्चिमी उत्तर प्रदेशसाठी मोठा दिवस आहे. आज राधाष्टमी आहे. दिवंगात कल्याण सिंह यांच्या अनुपस्थिती तीव्रतेने जाणवत आहे. आज कल्याण सिंह आमच्यासोबत असते तर राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विश्वविद्यालय आणि संरक्षण क्षेत्रात अलीगडची होत असलेल्या ओळखीबद्दल त्यांना खूप आनंद झाला असता.
हेही वाचा-मध्य प्रदेशमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात मिळणार उपनिषदासह पुराणाचे धडे!
महान स्वातंत्र्यसैनिकाच्या नावाने विद्यापीठाची पायाभरणी करणे ही भाग्याची गोष्ट
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, की आज देश हा स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करीत आहे. स्वातंत्र्याची अमृत महोत्सव साजरे केले जात असताना विकासाकरिता आणखी प्रयत्न आणि गती दिली जात आहे. भारताच्या स्वातंत्र्यात राजा महेंद्र प्रताप सिंह यांनी दिलेल्या योगदानाला वंदन करण्याची ही पवित्र संधी आहे. राजा महेंद्र प्रताप सिंह यांच्यासारखी दुरदृष्टी आणि महान स्वातंत्र्यसैनिकाच्या नावाने विद्यापीठाची पायाभरणी करणे ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे.
हेही वाचा-दिलासादायक! देशात कोरोना लसीकरणाने ओलांडला 75 कोटींचा टप्पा
विद्यापीठात संरक्षण क्षेत्राशी निगडीत मोठे सेंटर सुरू होणार
अलीगड मुस्लिम विद्यापीठाकरिता राजा महेंद्र प्रताप सिंह यांनी मोठी जमीन दिली होती. पायाभरणी झालेल्या या विद्यापीठात आधुनिक शिक्षणाचे मोठे केंद्र होणार आहे. त्याचबरोबर संरक्षण क्षेत्राशी निगडीत शिक्षण, संरक्षण उत्पादनाशी निगडीत तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ विकसित करण्यासाठी सेंटरही होणार आहे.
हेही वाचा-सीए अंतिम परीक्षेत बहिण-भावाचा डंका : बहिण नंदिनी देशातून पहिली तर सचिनला मिळाली 18 वी रँक