वायनाड (केरळ) :काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये भाजप, संघ आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, 'भाजप, आरएसएस आणि पंतप्रधान मोदी स्वतःला संपूर्ण भारत समजतात. पंतप्रधान हे संपूर्ण भारत नसून, भारताचे नागरिकही आहेत. देशात 140 कोटी लोक आहेत आणि ते भाजप किंवा आरएसएस नाहीत हे भाजप आणि आरएसएस विसरले आहेत. भाजप, आरएसएस किंवा पंतप्रधानांवर टीका करणे किंवा हल्ला करणे हा भारतावरील हल्ला नाही असा टोलाही राहुल यांनी यावेळी लगावला आहे.
माझ्यावर अनेक गुन्हेही दाखल केले जात आहेत : काँग्रेस नेते राहुल गांधी येथे आजोजीत जाहीर कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राहुल म्हणाले माझ्यावर वारंवार होणारे राजकीय हल्ले, पोलीस माझ्या घरी पाठवले जात आहेत, तसेच, माझ्यावर अनेक गुन्हेही दाखल केले जात आहेत. परंतु, याला मी घाबरत नसून माझा सत्यावर विश्वास आहे असही ते म्हणाले आहेत.
भारत जोडो यात्रा : 'महिलांवर अजूनही लैंगिक अत्याचार होत आहेत' या त्यांच्या विधानाबाबत काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'दरम्यान रविवारी दिल्ली पोलिसांचे एक पथक राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचले होते. दरम्यान, दुसऱ्याच दिवशी राहुल यांनी ही टिप्पणी केली आहे. राहुल गांधी यांनी यावेळी जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना नवीन घरांच्या चाव्यांचे वाटप केले आहे.