महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

pm modi inaugurates smriti van पंतप्रधान मोदींच्या हस्ते गुजरातमधील भुज येथे स्मृती वन स्मारकाचे उद्घाटन - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील भुज येथे स्मृती वन स्मारकाचे उद्घाटन pm modi inaugurates smriti van केले. भूज शहराच्या बाहेरील भागात 2001 च्या भूकंपग्रस्तांच्या स्मरणार्थ स्मृती वन स्मारक बांधण्यात आले आहे.

pm modi inaugurates smriti van
pm modi inaugurates smriti van

By

Published : Aug 28, 2022, 1:17 PM IST

कच्छ : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आज त्यांनी भुज येथे स्मृती वन स्मारकाचे उद्घाटन pm modi inaugurates smriti van केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेही उपस्थित होते. भूज शहराच्या बाहेरील भागात 2001 च्या भूकंपग्रस्तांच्या स्मरणार्थ स्मृती वन स्मारक बांधण्यात आले आहे. यानंतर पंतप्रधान मोदी कच्छ विद्यापीठाच्या मैदानावर जावून जाहीर सभेला संबोधित करतील आणि इतर प्रकल्पांचे लोकार्पण करतील.

शनिवारी पंतप्रधानांनीगुजरातमधील साबरमती रिव्हरफ्रंट येथे खादी महोत्सवाला हजेरी लावली. येथे हजारो महिला आणि पुरुषांच्या उपस्थितीत त्यांनी चरखा फिरवला. यानंतर रिव्हरफ्रंटजवळील एलिस ब्रिज ते सरदार ब्रिज दरम्यानच्या बेस्ट फूट ओव्हर ब्रिज अटल ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले. गेल्या आठवड्यात भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असतानाच अहमदाबादचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ साबरमती रिव्हरफ्रंटनेही एक दशक पूर्ण केले. पर्यटक आणि पाहुण्यांची आवड लक्षात घेऊन एलिस ब्रिज ते सरदार ब्रिज दरम्यान हा फूट ओव्हर ब्रिज बांधण्यात आला आहे.

हेही वाचाDevendra Fadnavis Slams shiv sena शिवसेना संभाजी ब्रिगेड युतीवर भाजप नेत्यांनी अशी दिली प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details