नवी दिल्ली : 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत भाजप दक्षिणेच्या मदतीने विजयाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहे. जर आपण 2019 च्या लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर, 6 दक्षिणेकडील राज्यांमधील 130 लोकसभा जागांपैकी भाजपकडे फक्त 29 जागा आहेत, त्यापैकी 25 कर्नाटकात, चार तेलंगणात आहेत. तर पक्षाला तामिळनाडू आणि इतर राज्यात लोकसभेची एकही जागा जिंकता आली नाही. यावेळी भाजपची नजर मिशन दक्षिणकडे असून पंतप्रधानांनी शनिवारपासून त्याची सुरुवात केली आहे. तेलंगणातील सिकंदराबाद ते तिरुपतीपर्यंत धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. त्याचवेळी चेन्नई ते तामिळनाडूतील कोईम्बतूरपर्यंत धावणाऱ्या वंदे भारतलाही हिरवा झेंडा दाखवण्यात आला. याशिवाय, या दोन दिवसांत पंतप्रधान तेलंगणा, तामिळनाडूनंतर कर्नाटकातील महामार्ग आणि अन्य प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.
वंदे भारत ट्रेनला हिरवा झेडा :चेन्नई ते कोईम्बतूरपर्यंत धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नई येथे तेराव्य वंदे भारत ट्रेनला कोईम्बतूर येथे हिरवी झेंडी दाखवली. त्याचप्रमाणे या ट्रेनच्या लोको पायलट केबिनमधून वंदे भारतचा वेग वाचकांना दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या ट्रेनच्या लोको पायलटने सांगितले की ट्रेन 160 किमी प्रतितास वेगाने धावू शकते, परंतु या मार्गाची क्षमता 130 किमी प्रतितास आहे, त्यामुळे ते या वेगाने धावत आहेत.