महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या ईदच्या शुभेच्छा.. ट्विट करत म्हणाले, 'ईद मुबारक..'

ईद - अल - अधा म्हणजेच बकरी ईदनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या ( PM Modi greets people on Eid-ul-Adha ) आहेत. 'ईद मुबारक! हा सन मानवजातीच्या भल्यासाठी कार्य करण्यास प्रेरणा देईल', असे ट्विट त्यांनी केले आहे.

narendra modi
नरेंद्र मोदी

By

Published : Jul 10, 2022, 11:29 AM IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईद-अल-अधा म्हणजेच बकरी ईदनिमित्त शुभेच्छा ( PM Modi greets people on Eid-ul-Adha ) दिल्या. 'हा सण आपल्याला मानवजातीच्या भल्यासाठी सामूहिक कल्याण आणि समृद्धीची भावना पुढे नेण्यासाठी कार्य करण्यास प्रेरणा देईल," असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले.

हज यात्रेची होते समाप्ती :ईद अल-अधा किंवा बकरी ईद आज सर्वत्र साजरा केला जात आहे. बकरी ईदला 'बलिदानाचा सण' देखील म्हटले जाते. हा सण इस्लामिक किंवा चंद्र कॅलेंडरच्या 12 व्या महिन्याच्या धु अल-हिज्जाच्या 10 व्या दिवशी साजरा केला जातो. आज वार्षिक हज यात्रेची समाप्ती होत असते. दरवर्षी ईदची तारीख बदलते कारण ईद ही इस्लामिक चंद्र कॅलेंडरवर आधारित आहे. हे कॅलेंडर 365-दिवसांच्या ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा सुमारे 11 दिवस लहान आहे.

राष्ट्रपतींनीही दिल्या शुभेच्छा : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ईद-अल-अधा निमित्त सर्व देशवासियांना, विशेषत: आपल्या मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा. हा सण त्याग आणि मानवसेवेचे प्रतीक आहे. या निमित्ताने मानवजातीच्या सेवेत स्वतःला झोकून देऊन देशाच्या समृद्धीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी कार्य करूया.

राहुल गांधींनीही केले ट्विट : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही ईद निमित्त शुभेच्छा देणारे ट्विट केले आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, ईद मुबारक! #EidAlAdha चा शुभ सोहळा सर्वांसाठी शांती, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो.

हेही वाचा :Bakrid 2022 : देशभरात बकरी ईदचा उत्साह.. दिल्लीच्या जामा मशिदीत भाविकांनी अदा केली नमाज

ABOUT THE AUTHOR

...view details