महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Modi Visit Rajasthan: गांधींच्या देशाचे नेतृत्व करत असल्यामुळे मोदींना जागतिक सन्मान -गेहलोत - CM Gehlot and PM Modi together in Mangarh Dham

पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींच्या देशाचे नेतृत्व करत असल्याने जागतिक स्तरावर त्यांचा आदर आहे. असे प्रतिपादन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवार (दि. 1 नोव्हेंबर)रोजी राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यातील मानगढ धाम येथे आले होते. येथील आयोजीच कार्यक्रमात बोलत होते.

पंतप्रधान मोदी अन् मुख्यमंत्री गेहलोत
पंतप्रधान मोदी अन् मुख्यमंत्री गेहलोत

By

Published : Nov 1, 2022, 10:42 PM IST

जयपुर/बांसवाडा (राजस्थान) -"जेव्हा पंतप्रधान मोदी परदेशात जातात, तेव्हा त्यांना खूप आदर मिळतो. त्या आदर मिळण्याचे कारण म्हणजे ते महात्मा गांधींच्या देशाचे पंतप्रधान आहेत. जिथे लोकशाहीची मुळे खोलवर आहेत. तसेच, जिथे स्वातंत्र्याच्या 70 वर्षांहून अधिक वर्षानंतरही लोकशाही जिवंत आहे, असेही गेहलोत म्हणाले आहेत. यावेळी गेहलोत यांनी पंतप्रधानांना सांगितले की, त्यांच्या सरकारने आदिवासींसाठी महाविद्यालये आणि विद्यापीठे सुरू करण्यापासून आरोग्य सुविधा पुरविण्यापर्यंत बरेच काही केले आहे. परंतु, "मी पंतप्रधानांना चिरंजीवी आरोग्य योजनेची तपासणी करण्याची विनंती करेन असही ते म्हणाले आहेत.

पंतप्रधानांकडे पाहणी करण्याची मागणी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याकडे राजकीय चाणाक्षपणा असेल तर तो राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांच्याकडे आहे. असे अनेकदा म्हटले जाते. आज मुख्यमंत्री गेहलोत यांनी ही गोष्ट कुठेतरी सिद्ध केली आहे. पंतप्रधान मोदींची सभा असेल आणि कोणताही मुद्दा जनतेशी संबंधित असेल तर पंतप्रधानांनी त्याकडे दुर्लक्ष करावे, असे क्वचितच पाहायला मिळते. आज मानगड धाममध्ये झालेल्या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री गेहलोत पंतप्रधान मोदींसोबत स्टेजवर होते. यावेळी त्यांनी राजस्थानशी संबंधित मागणीच मंचावर मांडली. त्याचवेळी मंचावर भाषण करताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींचा विदेशात आदर केला जातो, कारण ते तेथून आले आहेत जो गांधींच्या आदर्शांचा भारत आहे. जिथे स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही लोकशाही जिवंत आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री गेहलोत यांनी हावभावात राजस्थानची चिरंजीवी आरोग्य योजना ही देशातील सर्वोत्तम आरोग्य योजना असल्याचे सांगून या योजनेची पंतप्रधानांकडे पाहणी करण्याची मागणीही केली आहे.

ईटीव्ही भारतचा रिपोर्ट

यानंतर पंतप्रधान मोदींनीही मुख्यमंत्री गेहलोत यांना व्यासपीठावरून ज्येष्ठ मुख्यमंत्री म्हणून संबोधले आणि गेहलोत आणि मी मुख्यमंत्री म्हणून एकत्र काम केले असल्याचेही सांगितले. अशोक गेहलोत हे मुख्यमंत्र्यांच्या गटातील सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्र्यांपैकी एक होते. आजही गेहलोत हे व्यासपीठावर बसलेल्या सर्वांमध्ये ज्येष्ठ मुख्यमंत्री आहेत. पंतप्रधान मोदींनीही गेहलोत यांच्या शब्दांना त्यांच्याच शैलीत उत्तर दिले.

कॉंग्रेस पक्षासाठी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री गेहलोत आदिवासी भाग आणि सामान्य लोकांच्या समस्यांवर बोलले. काँग्रेस कदाचित आपल्या जाहीरनाम्यात त्याचा समावेश करेल आणि आदिवासी आणि सामान्य लोकांकडून मते मागतील असही बोलल जात आहे. गेहलोत यांनी गेल्या दोन दिवसांपासून असे वातावरण निर्माण केले होते की, पंतप्रधान जेव्हा राज्यात येतील तेव्हा ते काँग्रेसची दीर्घकाळची मागणी असलेल्या मानगड धामला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत करतील. मात्र, तसे झालेले नाही.

दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे एक तगडे नेते असल्याने इतर राजकीय पक्षांना ही संधी देऊ शकले नाहीत, की काँग्रेसच्या दबावाखाली त्यांनी मानगड धामला राष्ट्रीय स्मारक घोषीत केले. त्याचवेळी रतलाम-डुंगरपूर रेल्वे मार्गाचे काम मोदी सरकारच्या काळात थांबणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री गेहलोत यांनी दिले आहेत. आगामी काळात हा काँग्रेस पक्षाचा महत्त्वाचा मुद्दा असेल, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.

आपले सरकार आल्यास या रेल्वे मार्गाचे काम केले जाईल. राजस्थानच्या चिरंजीवी आरोग्य योजनेसाठी, ज्यासाठी गेहलोत यांना राहुल गांधींकडून प्रशंसा मिळाली आहे. शक्यतो काँग्रेसने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आपल्या जाहीरनाम्यात अशीच आरोग्य योजना ठेवावी. अशा परिस्थितीत गेहलोत यांनी पंतप्रधान मोदींच्या राजकीय खेळीमुळे काँग्रेस पक्षासाठी काही राजकीय मुद्दे वाचवण्यात यश मिळवल्याचे स्पष्ट होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details