नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॅस्टिल डे परेडला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 15 जुलैला अबुधाबीला जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सला रवाना होण्यापूर्वी फ्रान्सच्या एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे मित्र राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची मोठी स्तुती केली. काळ्या वादळातही राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे डगमगले नाहीत. त्यामुळे फ्रान्स आणि भारताची मैत्री नेहमीच कायम राहणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
भारत आणि फ्रान्समधील संबंध निर्णायक वळणावर :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1.4 अब्ज भारतीयांच्या वतीने आपण फ्रान्स सरकार आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे वैयक्तिकरित्या आभार व्यक्त करू इच्छितो, असे स्पष्ट केले. दोन्ही देशांमधील संबंध निर्णायक वळणावर आहेत. ही मैत्री पुढे नेण्यासाठी धोरणात्मक भागीदारीचे यश महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. अवकाश आणि संरक्षण यासारख्या संवेदनशील क्षेत्रात आमची भागीदारी पाच दशकापेक्षाही जुनी आहे. एकवेळ अशी होती, जेव्हा पाश्चिमात्य देश भारताबाबत अनुकूल नव्हते, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
भारत-फ्रान्स संबंध मजबूत :भारताने धोरणात्मक भागीदारी प्रथम फ्रान्ससोबत घोषित केली. भारतासह जगासाठी तो कठीण काळ होता, तेव्हापासून आमचे मैत्रीचे संबंध आहेत. केवळ दोन देशांसाठीच हे संबंध महत्त्वाचे नाही, तर त्याचे मोठे भू-राजकीय परिणाम असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. भारत आणि फ्रान्समधील संबंध उत्तम स्थितीत असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. भारत फ्रान्सचे हे संबंध मजबूत, विश्वासार्ह, सुसंगत असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
दोन्ही देशांचा बहुपक्षीयतेवर अतूट विश्वास : आमच्यातील परस्पर विश्वासाची पातळी अतुलनीय आहे. आम्ही धोरणात्मक स्वायत्ततेची तीव्र भावना व्यक्त करतो. दोन्ही देशांची आंतरराष्ट्रीय कायद्याशी सखोल बांधिलकी आहे. आम्हा दोघांनाही बहुध्रुवीय जग हवे आहे. दोन्ही देशांचा बहुपक्षीयतेवर अढळ विश्वास असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रेंच वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट करण्यात आले आहे.
भारत-फ्रान्स एकत्रित चीनशी देतील लढा : भारताचा चीनसोबत गलवान खोऱ्यावरुन सीमावाद सुरू आहे. चीनसोबतच्या खराब संबंधादरम्यान फ्रान्सकडून भारताला समर्थनाची अपेक्षा आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि फ्रान्समध्ये सर्वसमावेशक आणि व्यापक धोरणात्मक भागीदारी असल्याचे स्पष्ट केले. राजकारण, संरक्षण, सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि मानव केंद्रित विकासाच्या क्षेत्रात या भागीदारीमध्ये सहकार्याचा समावेश असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या फ्रान्सच्या वृत्तपत्रातील मुलाखतीत स्पष्ट करण्यात आले आहे.
दोन्ही देश आव्हाने पेलण्यास सक्षम : समान दृष्टी आणि मूल्ये असलेले देश द्विपक्षीय संस्थांमध्ये एकत्र काम करतात, तेव्हा ते कोणत्याही आव्हानाचा सामना करू शकतात. इंडो-पॅसिफिक क्षेत्रासह आमची मैत्री कोणत्याही देशाच्या विरोधात किंवा किंमतीवर निर्देशित केलेली नाही. आमचे उद्दिष्ट आमच्या आर्थिक आणि सुरक्षा हितांचे संरक्षण करणे, नेव्हिगेशन आणि वाणिज्य स्वातंत्र्य सुनिश्चित करणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे नियम पुढे नेणे असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष पाहुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे मित्र फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून 13 ते 14 जुलै दरम्यान फ्रान्सच्या दौऱ्यावर असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेधनात नमूद करण्यात आले आहे. ही भेट विशेष असून मला राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत खास पाहुणे म्हणून पॅरिसमधील फ्रेंच राष्ट्रीय दिन किंवा बॅस्टिल-डे समारंभाला उपस्थित राहायचे आहे. बॅस्टिल-डे परेडमध्ये भारताच्या तिन्ही सैन्याच्या तुकड्याही सहभागी होतील, तर भारतीय हवाई दल या प्रसंगी फ्लाय-पास्ट करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवेदनात स्पष्ट केले आहे.