नवी दिल्ली: BJP Parliamentary Board Meet: भाजप संसदीय पक्षाची पहिली बैठक संसदेच्या हिवाळी अधिवेशन 2022 दरम्यान आज दिल्लीत झाली. 2022 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक विजयासाठी भाजपच्या सर्व खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांचे अभिनंदन record breaking win in Gujarat polls केले. यावेळी गुजरातच्या विजयाचा दाखला देत पंतप्रधान म्हणाले की, यामध्ये बूथ प्रमुखांचा मोठा वाटा आहे. खासदारांना विजयाचा मंत्र देताना मोदी म्हणाले की, कार्यकर्त्यांचा मान राखला पाहिजे. PM Modi felicitated at BJP meeting
युवकांना जोडण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले पाहिजे. परिसरात स्वच्छतेची काळजी घ्यावी. सर्व खासदारांनी आपापल्या भागात G20 संदर्भात कार्यक्रम आयोजित करावेत. ठिकठिकाणी G-20 च्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. या विजयाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांचे भरभरून कौतुक केले.