नवी दिल्ली - जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरलेल्या ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी ( Prime Minister Narendra Modi ) अभिनंदन केले आहे. देशभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चोप्राने अमेरिकेतील युजीन येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप भालाफेक स्पर्धेत 88.13 मीटर फेक करून रौप्य पदक जिंकले. यापूर्वी, 2003 मध्ये पॅरिसमध्ये अंजू बॉबी जॉर्जने लांब उडीत जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी कांस्य पदक जिंकले होते.
pm modi congratulates neeraj : पंतप्रधान मोदींनी केले नीरज चोप्राचे अभिनंदन
नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीने अवघ्या भारतात जल्लोषाचे वातावरण आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी या कामगिरीबद्दल नीरज चोप्राचे अभिनंदन ( Pm Modi Congratulates Neeraj Chopra ) केले आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की,देशातील सर्वात प्रतिभावान खेळाडूंपैकी एक असलेल्या नीरज चोप्राने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. त्यांनी पुढे लिहिले, भारतीय खेळांसाठी हा खास क्षण आहे. नीरजला आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा. चोप्राने गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि नेमबाज अभिनव बिंद्रानंतर वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर ट्विटरवर देशभरातील नागरिकांकडून त्याचे अभिनंदन केले जात आहे.
हेही वाचा -Neeraj Chopra, World Athletics Championships : जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राला रौप्य पदक