ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

US Capitol violence : 'लोकशाही देशात शांततापूर्ण मार्गाने सत्तांतर व्हायला हवं' - PM Modi condemns US Capitol violence

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेत राडा घातल्याच्या कृत्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निषेध केला आहे. सत्तांतराची प्रक्रिया ही शांततापूर्ण वातावरणात व्हायला हवी, असे मत मोदींनी व्यक्त केले.

PM Modi
पंतप्रधान मोदी
author img

By

Published : Jan 7, 2021, 11:41 AM IST

नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेत राडा घातल्याच्या कृत्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निषेध केला आहे. लोकशाही देशांतील सत्तांतराची प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात व्हायला हवी, असे मत मोदींनी व्यक्त केले. बेकायदेशीर आंदोलनातून लोकशाहीला बाधा पोहचायला नको, असेही मोदी म्हणाले.

अमेरिकेच्या संसदेत सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये संसदेबाहेर संघर्ष उफळला आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी संसदेचे संयुक्त अधिवेशन बुधवारी बोलविण्यात आले होते. मात्र, यावेळी ट्रम्प समर्थकांनी संसदेबाहेर (यूएस कॅपिटॉल हील) राडा घातला. संसदेत घुसण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात आला. मात्र, पोलिसांनी त्यांना बळाचा वापर करून रोखले.

फेसबुक, इस्टाग्राम आणि ट्विटरची ट्रम्प यांच्या सोशल मीडिया अकांऊटवर कारवाई

फेसबुक, इस्टाग्राम आणि ट्विटरने नियमांचे उल्लंघन केल्याच ठपका ठेवत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट काही काळासाठी बंद केले आहे. २४ तासांसाठी ट्रम्प यांचे इस्टाग्राम खाते बंद करत असल्याची घोषणा इस्टाग्रामचे प्रमुख अ‌ॅडम मॉझेरी यांनी केले आहे. फेसबुकने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ट्रम्प यांचे व्हिडिओ काढून टाकले आहेत. तर ट्विटरनेही ट्रम्प यांच्या पोस्ट काढून टाकल्या आहेत.

मी कधीही हार मानणार नाही - ट्रम्प

अमेरिकेन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. तर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन विजयी झाले. २० तारखेला बायडेन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, निवडणुकीत मतांची अफरातफर झाली असून ट्रम्प यांनी हार पत्करण्यास नकार दिला आहे. अमेरिकेच्या संसदेबाहेर ट्रम्प यांनी बुधवारी रॅली आयोजित केली होती. यावेळी काही समर्थकांनी संसदेवर चाल केली. त्यांना पोलिसांनी विरोध केला. ट्रम्प समर्थकांना संसदेत जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

ABOUT THE AUTHOR

...view details