नवी दिल्ली - नव्या भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी 'आत्मनिर्भर भारत' अभियानाच्या माध्यमातून काम करा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी देशातील तरुणांना केले. देशाच्या स्वांतत्र्यासाठी आसामच्या जनतेने आणि तरुणांनी काम केले. आता नव्या भारतासाठी आत्मनिर्भर देशासाठी काम करा, असे मोदी म्हणाले. आसाममधील तेजपूर विद्यापीठाच्या पदवीदान समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. मोदींनी व्हर्च्युअली या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
ईशान्य भारतात विकासकामांना गती -
कोरोना काळात आत्मनिर्भर भारत अभियान आपला मंत्र बनला होता. सध्या सरकार ईशान्य भारतात अनेक विकास कामे करत आहे. संपर्क व्यवस्था, आरोग्य, शिक्षणासह पायाभूत सुविधांवर सरकार काम करत आहे. नव्या संधींचा पूरेपूर फायदा घ्या, असे मोदी तरुणांना उद्देशून म्हणाले.