महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केंद्रीय मंत्रिमंडळ खाते वाटप; जाणून घ्या, नवीन मंत्र्यांकडे कोणते सोपविले मंत्रालय

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर कोणत्या मंत्र्यांकडे कोणती जबाबदारी सोपविली जाणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण, आरोग्य, दूरसंचार, शिक्षण अशा महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मंत्र्यांना या विस्तारातून वगळलेले आहे.

By

Published : Jul 7, 2021, 10:09 PM IST

Updated : Jul 7, 2021, 11:32 PM IST

PM Modi Cabinet Reshuffle
केंद्रीय मंत्रिमंडळ खाते वाटप

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार करण्यात आला आहे. या विस्तारानंतर मंत्रिमंडळाचे वाटप जाहीर करण्यात आले आहे. नवीन सुरू करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे राहणार आहे. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: देखरेख करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातील पाच राज्यमंत्र्यांना केंद्रीय मंत्रीपदी बढती दिली आहे. त्यांच्याकडे नवीन मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरविस्तारात जुन्या १२ मंत्र्यांना वगळण्यात आले आहे. तर नवीन सात महिला मंत्र्यांचा समावेश केला आहे. महाराष्ट्रातील नारायण राणे, डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार आणि कपिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

कपिल पाटील हे पंचायतराजचे राज्यमंत्री व भारती पवार या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, भागवत कराड हे अर्थ राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पाहणार आहेत. तर नारायण राणे यांच्याकडे केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाचा पदभार देण्यात येणार आहे. रावसाहेब दानवे यांच्याकडील केंद्रीय ग्राहक कल्याण राज्यमंत्री जबाबदारी बदलली आहे. त्यांच्याकडे केंद्रीय रेल्वे, खाणी, कोळसा मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे.

हेही वाचा-MODI Cabinet Expansion : 'या' कारणांमुळे महाराष्ट्रातील चार नेत्यांना मिळाली केंद्रीय मंत्रिमंडळात संधी

  • अश्विनी वैष्णव हे नवीन रेल्वेमंत्री असणार आहेत. यापूर्वी पीयूष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाचा अतिरिक्त भार होता. वैष्णव यांच्याकडेच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्याकडे पूर्वी ही जबाबदारी होती.
  • अनुराग ठाकूर यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयासमेवत युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. यापूर्वी अनुराग ठाकूर हे अर्थमंत्रालय राज्यमंत्री म्हणून सांभाळत होते.
  • केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि रसायने आणि खते मंत्रालयाची एकत्रित जबाबदारी मनसुख मांडवीय यांच्याकडे असणार आहे.
  • हरदीप सिंग पुरी यांच्याकडे पूर्वीच्या म्हणजे गृहनिर्माण आणि शहर विकास या मंत्रालयासह पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी आहे.
  • केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे अतिरिक्त वस्त्रोद्योग आणि ग्राहक कल्याण मंत्रालयाचे कामकाज सोपविण्यात आले आहे. स्मृती इराणी यांच्याकडून वस्त्रोद्योग मंत्रालय काढल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याकडे नागरी विमान वाहतूक मंत्रालय सोपविण्यात आले आहे. त्यांचे वडील माधव सिंदिया हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व वैमानिक होते.
  • धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्रालयाचे काम पाहावे लागणार आहे.
  • स्मृती इराणी या नवीन केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री आहेत. त्यांच्याकडे स्वच्छता मोहिमेची जबाबदारी आहे.

हेही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळ खाते वाटप; अमित शाह यांच्याकडे राहणार सहकार मंत्रालय

हेही वाचा-नवीन केंद्रीय मंत्रिमंडळात 'या' सात नवीन महिला मंत्र्यांचा समावेश

Last Updated : Jul 7, 2021, 11:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details