नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात ४३ मंत्र्यांमध्ये ३६ नवीन चेहरे आहेत. विस्तारित मंत्रिमंडळामधील मंत्र्यांनी आज पदभार स्वीकारला आहे. यामध्ये अश्विनी वैष्णव, मीनाक्षी लेखी, अनुराग ठाकूर, राजीव चंद्रशेखर, किरेन रिजीजू, दर्शना विक्रम जरदोश, रावसाहेब दानवे, मनसुख मांडवीय, डॉ. भारती पवार आणि रामचंद्र प्रसाद सिंह यांचा समावेश आहे.
अश्विनी वैष्णव- ओडीशामधील भाजपचे खासदार असलेले अश्विनी यांनी आज केंद्रीय माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. वैष्णव हे १९९४ मधील बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी व्हार्टन स्कूलमधून एमबीए पदवी मिळविली आहे. २००४ मध्ये एनडीएच्या पराभवानंतर त्यांनी वाजपेयी यांचे खासगी सचिव म्हणून काम केले आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी म्हणाले, की आदरणीय पंतप्रधान यांनी देशसेवा करण्यासाठी मला खूप मोठी संधी दिली आहे, त्यांचे आभार मानतो. दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान आणि रेल्वेमध्ये खूप उर्जा आहे. त्यांच्या व्हिजनप्रमाणे मी काम करणार आहे, याची खात्री देतो. रेल्वे हे पंतप्रधान मोदी यांच्या व्हिजनचा मोठा भाग आहे. सामान्य माणूस, शेतकरी, गरीब आणि प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन घडण्यासाठी रेल्वेतून फायदे मिळणार आहे. लवकरच पदभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हेही वाचा-LIVE UPDATES : Modi Cabinet Expansion : मोदी 2.0 मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न, राणे-पाटील-कराड-पवार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
अनुराग ठाकूर- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेले अनुराग ठाकूर यांना केंद्रीय मंत्रिपदी बढती मिळाली आहे. त्यांनी आज युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाचा पदभार घेतला आहे. ठाकूर म्हणाले, की गेल्या सात वर्षात पंतप्रधान मोदी यांनी भारताला पुढे नेण्यासाठी खूप चांगले काम केले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारीही दिलेली आहे. मी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अर्थव्यवस्था मंदावली असताना त्यांनी अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाची राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. ते हमरिपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करता. दुर्गम भागातही त्यांनी सैन्यलात अधिकारी म्हणून काम केले आहे. अनुराग ठाकूर यांनी बीसीसीआय आणि हिमाचल प्रदेश क्रिकेट असोशियनचे प्रमुखही होते.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हेही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळ खाते वाटप; जाणून घ्या, नवीन मंत्र्यांकडे कोणते सोपविले मंत्रालय
मीनाक्षी लेखी-वृत्तवाहिन्यांवर वादविवादमुळे (डिबेट) मीनाक्षी लेखी हे देशात घरोघरी नाव माहित झाले आहे. त्या संसदेमध्येही प्रभावशाली वकत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांना सार्वजनिक उपक्रमावरील संसदीय समितीच्या चेअरमनपदाचा अनुभव आहे. तसेच त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाची जबाबदारीही सांभाळली आहे. त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. सर्व मित्रांच्यावतीने मी पंतप्रधान, गृहमंत्री, पक्षप्रमुख आणि सर्व टीमचे आभार मानते. त्यांनी मेहनत करून सर्वांना पदे दिली आहेत. महिलांनाही खूप मोठी जबाबदारी दिली आहे. लोक महिलांच्या सक्षमीकरणाबाबत बोलतात. मात्र, पंतप्रधानांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत. महिलांची दखल घेऊन त्यांना जबाबदारी देणे हे कौतुकास्पद आहे.
केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी हेही वाचा-Modi Cabinet Expansion : नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भागवत कराड, भारती पवार मोदींच्या मंत्रिमंडळात, 43 मंत्र्यांनी घेतली शपथ
मनसुख मांडवीय- गुजरातमधील राज्यसभेचे खासदार मनसुख मांडवीय यांच्याकडे जहाज बंदरे, जहाबांधणी, जलवाहतूक या मंत्रालयाची राज्यमंत्री म्हणून जबाबदारी होती. गुजरातमधील गावांमध्येही त्यांची जनजागृतीपर भाषणे लोकप्रिय आहेत. गुजरातमध्ये सर्वात कमी वयात आमदार होण्याची कामगिरीही त्यांनी केलेली आहे. त्यांच्याकडे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची जबाबदारी आहे.
केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय किरेन रिजिज्जू-ईशान्येकडील राज्यांचे प्रतिनिधीत्व करणारे म्हणून किरेन रिजिज्जू यांची ओळख आहे. ते अरुणाचल प्रदेशमधील खासदार आहेत. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. यापूर्वी त्यांनी २०१४ ते २०१९ मध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्रीपद भूषविले होते. ते सातत्याने देशात क्रीडा प्रसारासाठी सक्रिय असतात.
किरण रिजिज्जू म्हणाले, की मी कायदा आणि न्याय विभागात जात आहे. मात्र, प्रयत्न सुरुच राहणार आहेत. केंद्रीय न्याय व कायदा मंत्री म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे याला माझे प्राधान्य आहे. पारदर्शक राहण्याला माझे प्राधान्य राहणार आहे. क्रीडा विभागातील वेळ संस्मरणीय असणार आहे. टीम खूप छान होती.