महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोदींची अवस्था डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा वाईट होणार - ममता ब‌ॅनर्जी

अमेरिकेचे माजी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा वाईट अवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होणार असल्याची टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता ब‌ॅनर्जी यांनी केली. हिंसेने काहीच मिळवले जाऊ शकत नाही, असे त्या म्हणाल्या.

ममता ब‌ॅनर्जी
ममता ब‌ॅनर्जी

By

Published : Feb 24, 2021, 6:42 PM IST

नवी दिल्ली -यंदा पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकींचा बार उडणार आहे. यापार्श्वभूमीवर सत्तेत येण्यासाठी पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू असून विरोधकांकावर टीका केली जातेय. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हरल्यानंतर मी पुन्हा येईनचा नारा देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना अखेर हार मानावी लागली. डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा वाईट अवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होणार असल्याची टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता ब‌ॅनर्जी यांनी केली. हुगळीमध्ये एका सभेला त्या संबोधीत करत होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह संपूर्ण देशात द्वेष पसरवत आहेत. नरेंद्र मोदी हे सर्वांत मोठे दंगाबाज आहेत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची जी अवस्था झाली. त्यापेक्षाही वाईट अवस्था नरेंद्र मोदी यांची होणार आहे. हिंसेने काहीच मिळवले जाऊ शकत नाही, असे त्या म्हणाल्या.

तृणमूलचीच सत्ता कायम -

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचीच सत्ता कायम राहणार असल्याचा विश्वास ममता ब‌ॅनर्जी यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीमध्ये मी गोलकीपर राहील. तर तुम्ही (भाजपा) एकही गोल करू शकणार नाहीत. तुमचे सर्व शॉट गोल हे पोस्टवरून जातील, असे त्या म्हणाल्या. तसेच यावेळी त्यांनी कोळसा तस्करी घोटाळा प्रकरणी तृणमूलचे खासदार अभिषेक ब‌ॅनर्जी यांच्या पत्नीची सीबीआयकडून करण्यात आलेल्या चौकशीची निंदा केली. हा आमच्या महिलांचा अपमान आहे, असे त्या म्हणाल्या.

पश्चिम बंगाल निवडणूक -

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे 148 जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध तृणमूल असा अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळवण्यात यश आलं नाही. ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावण्यात यावेळी तरी भाजप यशस्वी होईल का याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details