नवी दिल्ली : मॉर्निंग कन्सल्टच्या ताज्या सर्वेक्षणात दिसून आले आहे की, पंतप्रधान मोदी हे 78 टक्के रेटिंगसह लोकप्रियतेच्या बाबतीत सर्व जागतिक नेत्यांमध्ये आघाडीवर आहेत. ताज्या रेटिंगनुसार, पीएम मोदींनी लोकप्रियतेच्या बाबतीत 22 देशांच्या जागतिक नेत्यांना मागे टाकले आहे. या नेत्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, युनायटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचाही समावेश आहे. मॉर्निंग कन्सल्ट या बिझनेस इंटेलिजन्स कंपनीने २६ ते ३१ जानेवारी दरम्यान हे सर्वेक्षण केले आहे.
जो बायडन पाचव्या स्थानी : पंतप्रधान मोदींनंतर मेक्सिकोचे अध्यक्ष लोपेझ ओब्राडोर आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज अनुक्रमे 68 टक्के आणि 58 टक्के मंजूरी रेटिंगसह दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी 52 टक्के रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहेत. तर ब्राझीलचे राष्ट्रपती लुला डी सिल्वा 50 टक्के मान्यता रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हे 40 टक्के सामान्य रेटिंगसह सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत.
1-4 टक्के कमी-अधिक त्रुटी शक्य : मॉर्निंग कन्सल्टनुसार, ग्लोबल लीडर आणि कंट्री ट्रॅजेक्टोरी डेटा हा देशातील सर्व प्रौढांच्या सात दिवसांच्या मतांच्या सरासरीवर आधारित आहे, ज्यामध्ये 1-4 टक्के कमी-अधिक त्रुटी शक्य आहे. अमेरिका वगळता प्रत्येक देशात नमुना आकार 500-5000 च्या दरम्यान आहे. प्रत्येक देशात वय, लिंग, प्रदेश आणि काही देशांमध्ये, अधिकृत सरकारी स्रोतांवर आधारित शिक्षणानुसार सर्वेक्षणांना महत्व दिले जाते.
अदानींच्या प्रतिष्ठेला धक्का : अमेरिकन इन्व्हेस्टमेंट रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाचे शेअर्स घसरत आहेत. मात्र आता फिच रेटिंग एजन्सीने अदानी समूहाला दिलासा दिला आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या रेटिंगवर अद्याप कोणताही परिणाम होणार नाही, असे फिचने म्हटले आहे. परंतु या प्रकरणावर मूडीज या अन्य एजन्सीने म्हटले आहे की, अदानी समूहाला भविष्यात भांडवल उभारण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा मोठी घसरण झाल्याचे पाहावयास मिळू शकते.
हेही वाचा :Adani FPO Story : अदानींनी स्वत:च्याच कंपन्यांमार्फत एफपीओमध्ये पैसे गुंतवले का? वाचा सविस्तर