महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

PM Modi Meet Mother Heeraben: 'जिंकू देत..', निवडणुकीच्या मतदानाआधी पंतप्रधान मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद.. - PM Modi in Gandhinagar

PM Modi Meet Mother Heeraben: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी पंतप्रधान मोदी अहमदाबादमध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदी उद्या मतदान करणार आहेत. तत्पूर्वी रविवारी पंतप्रधान मोदी त्यांची आई हिराबेन (हिराबा) यांना भेटण्यासाठी गांधीनगर PM Modi in Gandhinagar येथे आले होते. पंतप्रधान मोदींनी आईचे आशीर्वाद घेतले. PM Modi arrives to meet his mother Hira Ba

PM Modi Meet Mother Heeraben
निवडणुकीच्या मतदानाआधी पंतप्रधान मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद..

By

Published : Dec 4, 2022, 7:00 PM IST

अहमदाबाद (गुजरात): PM Modi Meet Mother Heeraben: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी अहमदाबादला पोहोचले. पंतप्रधान मोदींनी त्यांची आई हीराबेन (हीराबा) यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. पंतप्रधान सोमवारी मतदान करणार PM Modi in Gandhinagar आहेत. खरे तर गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. PM Modi arrives to meet his mother Hira Ba

पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादच्या राणीप येथील निशान शाळेत मतदानासाठी येणार आहेत. पीएम मोदी हे साबरमती विधानसभा मतदारसंघाचे मतदार आहेत. दुसऱ्या टप्प्यात मध्य आणि उत्तर गुजरातमधील ९३ जागांसाठी ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधील 19 जिल्ह्यांतील 89 जागांवर मतदान झाले. तर दुसऱ्या टप्प्यात 5 डिसेंबरला उर्वरित 93 जागांसाठी मतदान होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची घाटलोडिया जागा, तसेच पाटीदार नेता हार्दिक पटेल भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या विरमगाम आणि गांधीनगर दक्षिण मतदारसंघात अल्पेश ठाकोर यांचा समावेश असलेल्या काही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details