महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

PM Modi Kedarnath Visit: नरेंद्र मोदी केदारनाथ येथे पोहोचले, आदि शंकराचार्यांच्या पुतळ्याचे करणार अनावरण - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ येथे पोहोचले आहेत. ते येथे केदारनाथ मंदिरात पूजा-अर्जना करणार आहेत. मोदींच्या हस्ते येथे आदि शंकराचार्यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्यासोबतच अनेक योजनांचा ते शिलान्यास करतील.

PM Modi arrives at Kedarnath,
पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ येथे पोहोचले

By

Published : Nov 5, 2021, 8:53 AM IST

Updated : Nov 5, 2021, 9:17 AM IST

देहरादून - पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ येथे पोहोचले आहेत. ते येथे केदारनाथ मंदिरात पूजा-अर्जना करणार आहेत. मोदींच्या हस्ते येथे आदि शंकराचार्यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्यासोबतच अनेक योजनांचा ते शिलान्यास करतील.

नरेंद्र मोदी केदारनाथ येथे पोहोचले

उत्तराखंडमध्ये २०१३ साली आलेल्या महापूरात केदारनाथ मंदिराच्या जवळ असलेली आदि शंकराचार्यांची समाधी वाहून गेली होती. पुनर्निर्माण योजनेंतर्गत केदारनाथ मंदिराच्या मागे आता आदि शंकराचार्यांचा नवा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे आज मोदींच्या हस्ते अनावरण होणार आहे. त्यासोबत उत्तराखंडमधील अनेक योजनांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे तर काही योजनांचा शिलान्यास मोदींच्या हस्ते होईल.

जॉलीग्राट विमानतळावर पोहोचले मोदी

पंतप्रधान मोदी आज (शुक्रवार) सकाळी लष्कराच्या हेलिकॉप्टरने जॉलीग्राट विमानतळावर पोहोचले. विमानतळावर राज्यपाल ले. जनरल (निवृत्त) गुरमीत सिंग, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत, विधानसभाध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल यांनी मोदींचे स्वागत केले.

LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केदारनाथ येथे आदि शंकराचार्यांच्या पुतळ्याचे अनावरण

Last Updated : Nov 5, 2021, 9:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details