महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

PM Modi AP Tour :पंतप्रधान मोदी अल्लूरी सीतारामराज यांच्या 30 फूट उंच पुतळ्याचे करणार अनावरण - अल्लूरी सीतारामराज यांच्या 30 फूट उंच पुतळ्याचे अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. भीमावरममध्ये त्यांची सभा होणार आहे. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील भीमावरमजवळील कल्ला मंडळच्या पेडामिरममध्ये १६ एकरांवर मोठे स्टेज उभारण्यात आले आहे. "आझादी का अमृत महोत्सव" ( Azadi Ka Amrit Mahotsav ) कार्यक्रमाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारमार्फत अल्लुरी सीतारामराज यांची १२५ वी जयंती ( Alluri Sitaramaraj 125th Birth Anniversary ) साजरी करण्यात येत आहे. त्यांच्या पुतळ्याचेही पंतप्रधान अनावरण करणार आहेत.

पंतप्रधान मोदी अल्लूरी सीतारामराज यांच्या 30 फूट उंच पुतळ्याचे करणार अनावरण
पंतप्रधान मोदी अल्लूरी सीतारामराज यांच्या 30 फूट उंच पुतळ्याचे करणार अनावरण

By

Published : Jul 4, 2022, 9:44 AM IST

विजयवाडा ( आंध्र प्रदेश ) -"आझादी का अमृत महोत्सव" ( Azadi Ka Amrit Mahotsav ) कार्यक्रमाचा एक भाग म्हणून केंद्र सरकार अल्लूरी सीतारामराज यांची १२५ वी जयंती ( Alluri Sitaramaraj 125th Birth Anniversary ) साजरी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) सोमवारी पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील भीमावरम येथे मन्यम नायक अल्लूरी सीतारामराज यांच्या 30 फूट कांस्य पुतळ्याचे अनावरण ( Statue Unveiled ) करणार आहेत. त्यानंतर भीमावरममध्ये पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. यासाठी भीमावरमजवळील कल्ला मंडळाच्या पेडामिरममध्ये मोठे स्टेज तयार करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी अल्लूरी सीतारामराज यांच्या 30 फूट उंच पुतळ्याचे करणार अनावरण

नागरिकांसाठी आसन व्यवस्था - भीमावरममध्ये पावसाचा जोर आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या बंदोबस्तात अडचणी येत आहेत. सभा ठिकाणचा संपूर्ण परिसर भिजला आहे. राज्यमंत्री करुमुरी नागेश्वर राव यांनी विधानसभा परिसराची पाहणी केली. राजू वेगेसना फाउंडेशनच्या 16 एकर परिसरात एक लाख लोकांसाठी मंडप बांधण्यात आला आहे. स्टेजवरील भाषणे पाहण्यासाठी भीमावरम शहराच्या परिसरात तसेच गॅलरीमध्ये एलईडी स्क्रीन ( LED Screen In The Gallery ) लावण्यात आल्या आहेत. सभा परिसराच्या एका बाजूला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय नागरिकांना आसन व्यवस्थेकडे जाण्यासाठी दोन वाटा तयार करण्यात आल्या आहेत. व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपींसाठी खास गॅलरी तयार करण्यात आली आहे. त्याशिवाय, सेलिब्रिटींना बसण्यासाठी व्यासपीठ तयार केले गेले आहे.

पंतप्रधान मोदी अल्लूरी सीतारामराज यांच्या 30 फूट उंच पुतळ्याचे करणार अनावरण

नागरिकांसाठी वाहतूक व्यवस्था -विधानसभा परिसरापासून दीड किलोमीटर अंतरावर 4 हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले गेले आहे. दाखल होणाऱ्या लोकांसाठी 9,000 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच अल्लुरी सीतारामराजू उत्सव समितीतर्फे विविध शैक्षणिक संस्था आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या 7 हजार बसेसचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातही कोनसीमा येथून २ हजार बसेस येतील.कृष्णा, पूर्व गोदावरी, एलुरु आणि इतर जिल्ह्यांमधून तसेच हैदराबाद, चित्तूर, बंगलोर, चेन्नई, दिल्ली आणि इतर शहरांमधून लोक सोहळ्यासााठी हजर राहणार आहेत. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आदी देशांमध्ये स्थायिक झालेले तेलुगू सेलिब्रिटी ही हजेरी लावतील.

चिरंजीवींची भेट निश्चित -प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री चिरंजीवी पंतप्रधान मोदींच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात उत्सव समितीने माहिती दिली आहे. या भेटीमध्ये त्यांची काय चर्चा होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा - Samyukta Kisan Morcha: देशभरात शेतकऱ्यांची परिषद आयोजित करणार; संयुक्त किसान मोर्चाची घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details