महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Tribute to Mahatma Gandhi : महात्मा गांधींना पुण्यतिथी निमीत्त पंतप्रधानांसह मान्यवरांची श्रद्धांजली - महात्मा गांधी यांची पुण्यतिथी

महात्मा गांधी यांच्या 74 व्या पुण्यतिथी (Mahatma Gandhi 74th death anniversary) निमीत्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवर नेत्यांनी राजघाटावर श्रद्धांजली वाहिली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे नायक असलेले मोहनदास करमचंद गांधी यांचा 30 जानेवारी 1948 वा मृत्यू झाला होता.

Samadhi of Mahatma Gandhi
महात्मा गांधींची समाधी

By

Published : Jan 30, 2022, 10:00 AM IST

Updated : Jan 30, 2022, 11:34 AM IST

नवी दिल्ली:महात्मा गांधी यांची आज रविवारी 74 वी पुण्यतिथी (Mahatma Gandhi 74th death anniversary) आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह इतर मान्यवर नेत्यांनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजलि (PM Modi to pay tribute at Rajghat) अर्पण केली.भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे नायक असलेले मोहनदास करमचंद गांधी यांचा 30 जानेवारी 1948 वा मृत्यू झाला होता. महात्मा गांधींनी देशासाठी दिलेले योगदान लोक कायम स्मरणात ठेवतील. त्यांचा आदर्श, अहिंसेची प्रेरणा, सत्याची ताकत यामुळे इंग्रजांना झुकायला भाग पाडले. त्यांचे हे योगदाना मोठे आहे. कोणी त्यांना बापू म्हणतो तर कोणी राष्ट्रपिता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजघाटावर आदरांजली वाहिली,

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचेही महात्मा गांधींना अभिवादन

शरद पवार यांनी महात्मा गांधींना ट्वीट करून केले अभिवादन
महात्मा गांधी यांनी सत्य व अहिंसेच्या मूल्यांद्वारे स्वातंत्र्यप्राप्तीचा मार्ग प्रकाशमान केला. स्वराज्य, स्वदेशी, सर्वोदय ही तत्त्वे अंगिकारून देशाला परिवर्तनाची नवी दिशा दाखवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन! असे त्यांनी ट्वीट मधे म्हणले आहे

शरद पवारांचे ट्विट

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महात्मागांधी यांना वाहिली आदरांजली.

Last Updated : Jan 30, 2022, 11:34 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details