गोवा (पणजी ) :पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Modi ) गुरुवारी डिजिटल माध्यमातून राज्य सरकारच्या वतीने आयोजित 'रोजगार मेळाव्या'ला ( Employment Fair Program ) संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. सावंत यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले की, 'रोजगार मेळाव्यात' विविध विभागातील पदांसाठी १,२५० जणांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. सावंत यांनी सांगितले की, रोजगार मेळाव्याअंतर्गत निवड झालेल्या तरुणांना पोलीस विभाग, अग्निशमन व आपत्कालीन सेवा, नियोजन व सांख्यिकी आणि कृषी विभागातील भरतीसाठी नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. ( Employment Fair Program Today In Goa )
Employment Fair Program : रोजगार मेळाव्याला पंतप्रधान मोदींनी केले संबोधित; १,२५० जणांना दिली जाणार नियुक्तीपत्रे - Employment Fair Program Today In Goa
गोव्याचे सीएम सावंत यांनी सांगितले की, रोजगार मेळाव्याअंतर्गत ( Employment Fair Program ) पोलिस विभाग, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, नियोजन आणि सांख्यिकी आणि कृषी विभागांमध्ये भरतीसाठी निवडलेल्या तरुणांना नियुक्ती पत्रे दिली जातील. ( Employment Fair Program Today In Goa )

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सकाळी 10.30 वाजता पणजीजवळील दोना पौला येथील राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये होणाऱ्या रोजगार मेळाव्यात उपस्थितांना संबोधित केले. राज्य सरकारच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याअंतर्गत ही बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी रोजगार मेळाव्याअंतर्गत 71,000 हून अधिक तरुणांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नियुक्ती पत्रे दिली होती.