नवी दिल्ली - देशभरात 1 ते 7 मार्च हा आठवडा ‘जनऔषधी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. लोकांना स्वस्त दरात गुणवत्तापूर्ण औषधं मिळावीत यासाठी जनऔषधी योजना सुरु करण्यात आली आहे. त्याबाबत जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी’ परियोजनेच्या लार्भाथ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांनी 7 हजार 500 व्या जनऔषधी केंद्राचं लोकार्पण केलं.
शिलाँग इथल्या इंदिरा गांधी आरोग्य आणि आयुर्विज्ञान क्षेत्रिय केंद्रात हे व्या जनऔषधी केंद्र उभारण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनऔषधी दिवस कार्यक्रमात सहभागी झाले.