महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

PM-Kisan Scheme: पंतप्रधान येत्या 9 ऑगस्टला पीएम -किसान योजनेचा पुढील हप्ता वितरित करणार - पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता 9 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना देणार आहे.पीएम किसान योजना अर्थात पंतप्रधान शेतकरी सन्मान नीधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली. या अंतर्गत वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजार इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते.

PM-Kisan Scheme
पीएम -किसान योजना

By

Published : Aug 8, 2021, 7:56 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM-KISAN) या योजनेचे लाभार्थी असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हप्त्याचे वितरण करणार आहेत. या योजनेद्वारे 19,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वितरण होणार आहे. तर याचा लाभ 9 कोटी 75 लाख लाभार्थी शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून देशाला संबोधित करतील. केंद्रीय कृषीमंत्रीदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

यापूर्वी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभार्थ्यांना मे महिन्यात अक्षय तृतीयेच्या दिवशी अर्थात 14 मे रोजी आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला होता. 9.5 कोटी शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याच्या स्वरुपात 19000 कोटींची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यात आली होती.

PM-KISAN योजनेबद्दल -

पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 2000/- रुपये तीन समान मासिक हप्त्यांमध्ये म्हणजे एकूण 6000/-रूपये इतका निधी दिला जातो. हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जातो. या योजनेद्वारे शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत 1.38 लाख कोटी इतका सन्मान निधी हस्तांतरित करण्यात आली आहे.

पैसे तीन हप्त्यांमध्ये वर्ग -

पंतप्रधान शेतकरी सन्मान नीधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली. शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये वर्ग करते. पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो, तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. या योजनेचं वार्षिक बजेट हे 75 हजार कोटी रुपये इतकं आहे.

हेही वाचा -Golden Boy Neeraj Chopra : सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने दिली 'ही' प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details