नवी दिल्ली - मोफत रेशन देण्यासाठी ' पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ' ( PM Garib Kalyan Anna Yojana ) मार्च 2022 पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर ( Union Minister Anurag Thakur ) यांनी दिली आहे.
4 महिने मुदत वाढवली -
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले आहे की, केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की कोविड महामारी चालू आहे, त्यामुळे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून देशातील 80 कोटी पेक्षा जास्त नागरिकांना 5 किलो गेहू आणि तांदूळ मोफत देण्याचे काम मार्च 2020 पासून आतापर्यंत करण्यात आले आहे. त्याला डिसेंबर ते मार्च 2022 पर्यंत 4 महिने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.