नवी दिल्ली - एकेकाळी भारतीय नौदलाची शान समजले जणारे आयएनएस विराट हे विमानवाहू जहाज तोडण्यात येणार आहे. आयएनएस विराटचे संग्रहालयात रुपांतर करण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. 'आयएनएस विराट' ला एका खासगी कंपनीने पूर्ण प्रकियेनुसार खरेदी केले आहे. आता ती एक खासगी संपत्ती असून तीचे 40 टक्के तोडकाम झाले आहे, असे न्यायालायने आपल्या सुनावणीमध्ये म्हटलं
मुख्य न्यायाधीश एस ए बोबडे, न्यायमूर्ती वी रामसुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती ए एस बोपन्ना यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी केली. आयएनएस विराटचे तोडकाम रोखण्यात यावे आणि तीचे संग्रहालयात रुपांतर करावे अशी मागणी करणारी याचिका दाखल झाली होती. त्यावर आज सुनावणी झाली. याचिकाकर्त्याच्या भावनांचा आदर आहे. मात्र, आता खूप उशीर झाल्याचे न्यायमूर्ती म्हणाले.
30 वर्षे नौदलात महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविली -
जगातील सर्वात जुने व भारतातील सर्वात मोठे विमानवाहू जहाज 'आयएनएस विराट' मार्च 2017ला भारतीय नौदलातून सेवानिवृत्त झाले होते. भावनगर जिल्ह्यातील अलंग समुद्रकिनाऱ्यावर त्याचे तोडकाम करण्यात आले. आयएनएस विराट या विमानवाहू जहाजाने 30 वर्षे नौदलात महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविली आहे. सर्वात जुनी युद्धनौका अशी आयएनएस विराटची ओळख आहे. आयएनएस विराटचा नौदलात 1987मध्ये समावेश करण्यात आला. श्रीराम ग्रुपने मेटल स्क्रॅप ट्रेडच्या लिलावातून आयएनएस विराट ही 38.54 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. कारगिल युद्धावेळी पाकिस्तानच्या कराची बंदरातून युद्धनौका बाहेर पडू नये, यासाठी शत्रूवर वचक ठेवण्याची कामगिरी या जहाजाने केली होती.
वस्तुसंग्रहालयात रुपांतराची मागणी -
आयएनएस विराट ही भंगारात काढण्याचा निर्णय भारतीय नौदलाशी चर्चा करून घेण्यात आल्याचे केंद्र सरकारने गेल्या वर्षी संसदेत सांगितले होते. आयएनएस विराट ही भारतीय नौदलाने 65 दशलक्ष डॉलरला खरेदी केली होती. यापूर्वी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतदेखील 2014 मध्ये भंगारात काढण्यात आली आहे. या युद्धनौकेचे वस्तुसंग्रहालयात रुपांतरण करावे, अशी नागरिकांनी मागणी केली होती.
हेही वाचा -शिवसेना नेते संजय राऊत बुधवारी बेळगावमध्ये; शेळके यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन