नवी दिल्ली -केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), दिल्ली येथे कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. कोरोनाच्या संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे लसीकरणाच्या मोहिमेला वेग आला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत एकूण 6,51,17,896 लस डोस देण्यात आले आहेत.
1 एप्रिल म्हणजे आजपासून देशभरातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी हे जाहीर केले होते. 16 जानेवरीला भारतामध्ये कोरोना लसीकरणाला सुरवात झाली होती. यात वैद्यकीय कर्मचारी, कोरोना योद्धे, 60 वर्षांवर वय असणारे नागरिक आणि इतर गंभीर आजार असलेले 45 वर्षांवर वय असणारे नागरिक यांना कोरोनाची लस देण्यात आली होती. आता 45 वर्षावरील नागरिकांना लस टोचवण्यात येणार आहे.