महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी भाजप कडून पीयूश गोयल, अनिल बोंडें महाडिकांना उमेदवारी - धनंजय महाडिक

भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारांची यादी (candidature from BJP for Rajya Sabha) जाहिर केली आहे. यात महाराष्ट्रातुन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Union Minister Piyush Goyal) राज्याचे माजी मंत्री डाॅ. अनिल बोंडे (Former Minister Dr. Anil Bonde) तसेच धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या नावाची घोषना करण्यात आली आहे.

Piyush Goyal and Dr Anil bonde
पीयूश गोयल डाॅ. अनिल बोंडें

By

Published : May 29, 2022, 7:39 PM IST

Updated : May 30, 2022, 8:02 AM IST

नवी दिल्ली:भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. यात महाराष्ट्रातुन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal ) राज्याचे माजी मंत्री डाॅ. अनिल बोंडे (Dr Anil Bonde) तसेच धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांची उमेदवारी घोषीत केली आहे. राज्यसभा निवडणुकीवरुन सध्या महाराष्ट्राचे वातावरण तापले आहे. शिवसेना सहाव्या जागेसाठी लढत असुन शिवसेनेने आपल्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या जागेसाठी प्रयत्न केले पण शिवसेनेने त्यांना शिवबंधन घालण्याची अट ठेवली शेवटी त्यांनी निवडणुकीतुन माघार घेतली. त्या नंतर भाजपने तिसऱ्या जागेसाठी तयारी सुरु केली असे वातावरण तयार केले होते पण भाजपने आज जाहिर केलेल्या यादी नुसार महाराष्ट्रातुन दोन उमेदवारांची नावे अधिकृतरित्या जाहिर केले आहेत.

अमरावती: भाजपच्या वतीने राज्यसभेसाठी डॉ. अनिल बोंडे यांचे नाव निश्चित झाल्यामुळे अमरावतीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मोर्शी विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर अनिल बोंडे यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. 2009 मध्ये डॉ. बोंडे हे अपक्ष उमेदवार म्हणून मोर्षी मतदारसंघातून विजयी झाले होते तर 2014 मध्ये भाजपची उमेदवारी घेऊन डॉ. अनिल बोंडे यांनी मोर्शी मतदार संघात बाजी मारली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अखेरच्या तीन महिन्यांसाठी डॉक्टर अनिल बोंडे यांनी कृषिमंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र अल्पशा फरकांनी डॉ. बोंडे पराभूत झाले होते. शेतकरी नेते अशी ओळख असणारे डॉक्टर अनिल बोंडे यांच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी बळकट होण्यास वाव असून विदर्भाचा विकास सुद्धा त्यांच्या माध्यमातून साधू शकणार अशी अपेक्षा भाजप कार्यकर्त्यांना आहे.

कृषी विकासासाठी डॉ. अनिल बोंडे यांची उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे. त्यांना कृषी क्षेत्रात दांडगा अनुभव आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी त्यांची नेहमीच धडपड राहिली आहे. कृषी च्या माध्यमातून विदर्भाचा विकास कसा साधला जावा यासाठी त्यांचे आजवरचे कार्य असून राज्यसभेत वर्णी लागल्यावर डॉ. अनिल बोंडे यांच्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल असा विश्वास भाजपचे शहर अध्यक्ष किरण पातुरकर यांनी डॉ. अनिल बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्याबाबत व्यक्त केला.

Last Updated : May 30, 2022, 8:02 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details