गुरुदासपूर (पंजाब) : दीनानगर परिसराला लागून असलेल्या 5 गावांमध्ये पिट बुल कुत्र्याने हल्ला (Pitbull Dog Attack Gurdaspur Punjab) करून 12 जणांना गंभीर जखमी (Pit bull dog injured 12 people ) केले. रात्री उशिरा या कुत्र्याने टांगोशाह गावापासून चौहाणा गावापर्यंत प्रचंड दहशत (Pitbull Dog Terror Punjab) निर्माण केली. टांगोशाह ते चौहाणा गावाचे अंतर 15 किमी आहे. दरम्यान, पिटबूल डॉगने राष्ट्रीय महामार्गही ओलांडला. टांगोशाह गावाजवळील एका भट्टीवर काम करणाऱ्या दोन मजुरांवर त्याने प्रथम हल्ला (Pitbull Dog Labour Attack) केला.
पिटबूल कुत्र्याच्या हल्ल्यात गावकरी आणि जनावरे जखमी पिटबूल आणि भटक्या कुत्र्यांमध्ये जबर संघर्ष- हल्ला झालेल्या दोघांनीही धाडसाने कुत्र्याच्या गळ्यातील साखळी हिसकावून घेत स्वतःला वाचवले. यानंतर तो कुत्रा साखळीतून बाहेर पडला आणि रात्री गावात पोहोचला. गावातील हवेलीत बसलेल्या 60 वर्षीय दिलीप कुमार यांच्यावर त्याने हल्ला केला. दिलीप कुमार यांनी हिंमत दाखवत कुत्र्याच्या मानेवर हात ठेवून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. दिलीप कुमार यांच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांच्या वाड्यात राहणाऱ्या एका भटक्या कुत्र्याने पिटबुलवर हल्ला केला आणि त्याला मागून पकडले. यामुळे दिलीप कुमार यांना पिट बुलच्या तावडीतून सुटण्याची संधी मिळाली आणि ते घराच्या दिशेने धावले. मात्र पिटबुलने त्यांचा पाठलाग करून पुन्हा त्यांना रस्त्यावर पाडले आणि काही अंतर फरफटत नेले.
पिटबूलने गावातही माजविला धुमाकूळ- पिटबूल कुत्र्याच्या हल्ल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. तोपर्यंत गावकरी जमा झाले; पण दिलीप कुमार यांना कुत्र्याच्या हल्ल्यातून सोडवण्याचे धाडस कोणीही केले नाही. दरम्यान वाटेत दिलीप कुमार यांच्या भावाच्या कुटुंबीयांनी गेटच्या आत रस्त्यावरून खेचून त्यांचा जीव वाचवला. पिटबूल कुत्र्याने दिलीपला एवढ्या वाईट प्रकारे ओरबाडले की, हवेलीपासून घरापर्यंतचा रस्ता रक्ताने माखला होता. कुत्रा एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने गावकरी बलदेव राज यांच्या वासरावर हल्ला केला आणि त्याचा पाय गंभीर जखमी केला. तेथून तो कुत्रा घरोटा रस्त्याच्या दिशेने धावत वीटभट्टीजवळ पोहोचला. त्याने वाटेत अनेक जनावरांवर हल्ला चढविला. त्याने भट्टीवरील नेपाळी चौकीदार रामनाथ यांच्यावरही हल्ला केला. भट्टीवरील दोन भटक्या कुत्र्यांनी पिटबूलवर हल्ला करून रामनाथची सुटका केली.
पिटबूलला गावकऱ्यांनी बेदम झोडपले- पिटबूल कुत्रा छनी गावाकडे धावत सुटला आणि त्याने तेथे झोपलेल्या मंगलसिंगला चावा घेतला. रात्रभर दहशत माजवत पिटबूल कुत्र्याने एकूण 12 जणांना जखमी केले. यानंतर पिटबूल धावत चौहाना गावात पोहोचला आणि शेतात फिरत असलेल्या कॅप्टन शक्ती सिंह या सेवानिवृत्त लष्करी जवानावर हल्ला करून त्यांच्या हाताला जबर दुखापत केली. शक्ती सिंगने हिंमत न हारता हातातली काठी कुत्र्याच्या तोंडात घातली आणि दोन्ही कानात पकडली. तोपर्यंत शक्ती सिंहची आरडाओरडा ऐकून गावातील लोकही तेथे पोहोचले. दरम्यान शक्तीसिंग आणि इतर गावकऱ्यांनी पिटाळलेल्या पिटबूलला काठ्यांनी बेदम मारहाण केली. पिटबूलच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना दीनानगर आणि गुरुदासपूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.