महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Dhirendra Krishna Shastri: फोटो मधे पहा बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची उत्तराखंड भेट - Bageshwar Dham is on a tour of Uttarakhand

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात असलेल्या बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री हरिद्वारच्या पतंजली योगपीठात पोहोचले आहेत. पतंजली योगपीठाचे सरचिटणीस आचार्य बालकृष्ण यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. फोटो मधे पाहूया धीरेंद्र शास्त्रींची उत्तराखंड भेट (Peethadhishwar Dhirendra Shastri)

Dhirendra Krishna Shastri's visit to Uttarakhand
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची उत्तराखंड भेट

By

Published : Jan 28, 2023, 12:55 PM IST

आचार्य बालकृष्ण यांनी केले धीरेंद्र कृष्ण शास्त्रीचे स्वागत

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री हरिद्वारच्या पतंजली योगपीठात पोहोचले आहेत. 13 ते 19 फेब्रुवारी दरम्यान बागेश्वर धाम येथे होणाऱ्या महायज्ञासाठी उत्तराखंडमधील प्रमुख धार्मिक नेते, संत आणि महंतांना आमंत्रित करण्यासाठी धीरेंद्र कृष्ण शास्त्री हरिद्वारला पोहोचले आहेत. यादरम्यान धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आचार्य बालकृष्ण यांचे मोठे बंधू असे वर्णन केले आहे.

आचार्य बालकृष्ण यांच्या समवेत विहार करताना

हरिद्वारला आल्यानंतर खूप बरे वाटल्याचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितले. यावेळी त्यांनी देशाला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी पतंजली योगपीठ, योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्यासह सर्व प्रमुख सनातन धर्माचार्यांकडून सहकार्य मागितले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटले होते की जेव्हा बागेशचर धाम सरकारला चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान देण्यात आले तेव्हा त्यांनी कथा अर्धवट सोडली.

आचार्य बालकृष्ण यांच्या सोबत धीरेंद्र कृष्ण शास्त्री

बाबांच्या कथेत भूतांपासून रोगांपर्यंत सर्व काही बरे होते असे म्हणतात. बाबांच्या समर्थकांचा असा दावा आहे की बागेश्वर धाम सरकार एखाद्या व्यक्तीला पाहिल्यावर सर्व प्रकारच्या समस्या जाणून घेतात. व त्या सोडवण्यासाठई उपाय योजनाही सुचवतात. पंडित धीरेंद्र शास्त्री सध्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची आचार्य बालकृष्ण यांच्या सोबतचे काही फोटो समोर आले आहेत.

गोसेवा करताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री

पतंजली योगपीठावर पोहोचल्यावर आचार्य बालकृष्ण यांनी बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे स्वागत केले. धीरेंद्र शास्त्री यांना रुद्राक्षाची माळही अर्पण केली.बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र शास्त्री यांनी आचार्य बाळकृष्ण आणि इतर संत-महात्म्यांची भेट घेतल्यानंतर यमकेश्वर ब्लॉक पतंजली योगपीठाच्या आयुष ग्राम आश्रमाचा दौरा केला.

थंड पाणी पिऊन तृष्णा शांत करताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री

धीरेंद्र शास्त्री काल संध्याकाळी उशिरा हरिद्वारच्या दिव्य योग आश्रमात पोहोचले. यावेळी आचार्य बालकृष्ण हे धीरेंद्र शास्त्री यांच्यासोबत दिसले. यावेळी धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, हरिद्वारला पोहोचल्यानंतर एक अद्भुत अनुभव आला. बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र शास्त्री सध्या सतत मीडियाच्या चर्चेत असतात. त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप आहे. फोटोत पहा, पंडित धीरेंद्र शास्त्री गोसेवा करताना दिसत आहेत.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची उत्तराखंड भेट

धीरेंद्र शास्त्री हे हरिद्वार येथील विंध्यवासिनी आश्रमात वास्तव्यास आहेत. तीथुन त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हणले आहे की, कायद्यात राहाल तर, फायद्यात राहाल. धीरेंद्र शास्त्रींची सध्या माध्यमांत मोठी चर्चा आहे. त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप आहे. याबाबत त्यांच्याकडून पुरावे मागवले जात आहेत. बाबांच्या समर्थकांचा असा दावा आहे की, धीरेंद्र शास्त्री हे एखाद्या व्यक्तीला पाहिल्यावर सर्व प्रकारच्या समस्या जाणून घेतात. ते सोडवण्याचा दावा करतात. दुसरीकडे, धीरेंद्र शास्त्रीचें म्हणणे आहे की, ते फक्त लोकांचे अर्ज देवाकडे (बालाजी हनुमान) देण्याचे साधन आहे.

हेही वाचा : Shree Mahakaleshwar Temple Ujjain: आता 'स्मार्ट' होणार बाबा महाकालांचा दरबार.. हार, फुलांपासून खत.. कचऱ्याचा होणार गॅस

ABOUT THE AUTHOR

...view details