चंडीगढ -मागील काही दिवसापूर्वी एका तरुणाच्या झालेल्या निघृण हत्येसंदर्भात नवीन खुलासा समोर आला आहे. सध्यासोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये निहंग प्रमुख बाबा अमन सिंह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर दिसत आहेत. बाबा अमन सिंह यांच्या ग्रुपच्या साथीदारांवर सिंघु बॉर्डरवर एक तरुणाची हत्या करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी हा फोटो ट्वीट केल्यानंतर यावरून वादंग उठले आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आता सत्य समोर येत आहे. रहस्यावरून पर्दा उठत आहे. या हत्येमागे कोण आहे ? कोण शेतकऱ्यांविरोधात षड्यंत्र करत आहे?. याचा अर्थ आहे की, सुरजेवाला यांचे म्हणणे आहे की, सिंघु बॉर्डर (Singhu Border) वर झालेल्या हत्येमध्ये भाजपचाच हात आहे. या षड्यंत्राचा भाग असलेला फोटो सुरजेवाला यांनी आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलवरून शेअर केला आहे.