गुवाहाटी -आसाम विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या 1 एप्रिलला होणार आहे. 27 मार्चला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. उद्या होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानात, 39 विधानसभा मतदार सघांतून 345 उमदेवार आपलं नशीब आजमावणार आहेत. 73 हजार 44 लाख 631 नागरिक मतदानाचा हक्क बजावतील.
गेल्या आठवड्यात झालेल्या प्रचार दौऱ्यात काँग्रेस आणि भारतीय जनतापक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक प्रमुख नेत्यांचे रोड शो, घणाघाती भाषणे यांनी हा टप्पा अगदी गाजवून सोडला.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए आणि काँग्रेस प्रणीत महाज्योत या पक्षांमध्ये थेट लढत होणार आहे. या टप्प्यात भाजपा 34, काँग्रेस 28, एआययूडीएफ 7, एजेपी 6, एजेपी 19, सीपीआय(एमएल) एल 3, अपक्ष 176 आणि इतर पक्षाचे 72 उमेदवार रिंगणात आहेत. 13 जिल्ह्यातील 39 मतदारसंघात 10 हजार 592 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. विविध पक्षाच्या 345 उमेदवारांचे भविष्य उद्या मतपेटीत बंद होईल. एकूण उमेदवारांमध्ये 26 महिला उमेदवार आहेत.
राज्यातील 8-अलगपूर मतदारसंघात 19 उमेदवार मैदानात आहेत. तर सर्वांत कमी 2 उमेदवार 69-उडलगुरी मतदारसंघात उभे आहेत. राज्यात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी केंद्र आणि राज्य सशस्त्र पोलीस दलासह सुरक्षा कर्मचार्यांच्या एकूण 310 कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत.