महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

16 महिन्यांच्या मुलीच्या नाकाद्वारे काढला ब्रेन ट्यूमर - मुलीच्या नाकाद्वारे काढला ब्रेन ट्यूमर

16 महिन्यांच्या मुलीच्या नाकाद्वारे ब्रेन ट्यूमर यशस्वीरीत्या काढून टाकण्यात आला आहे. ही शस्त्रक्रिया करून पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिस्टूशन ऑफ मेडिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च' (पीजीआयएमईआर) मधील डॉक्टरांनी इतिहास रचला.

ब्रेन ट्यूमर
ब्रेन ट्यूमर

By

Published : Jan 23, 2021, 10:33 PM IST

चंदीगढ - पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिस्टूशन ऑफ मेडिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च' (पीजीआयएमईआर) मधील डॉक्टरांनी 16 महिन्यांच्या मुलीच्या नाकाद्वारे ब्रेन ट्यूमर यशस्वीरीत्या काढून टाकला. अमायरा असे त्या मुलीचे नाव आहे. अमायरा ही न्यूरोएंडोस्कोपी होणारी सगळ्यात लहान मुलगी ठरली आहे.

अमायरा उत्तराखंडची रहिवासी आहे. तीची दृष्टी कमी झाली होती. त्यामुळी तील पीजीआयएमइआरमध्ये आणण्यात आले. तीचे एमआरआय करण्यात आल्यानंतर ब्रेन ट्यूमर असल्याचे समोर आले. ही शस्त्रक्रिया जवळपास सहा तास चालली. या शस्त्रक्रियेदरम्यान ब्रेन ट्यूमर नाकातून काढून टाकण्यात आला.

नाकातून ब्रेन ट्युमरच्या शस्त्रक्रियेचे तंत्र विकसित झाले असून, त्यासाठी अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान आले आहे. ट्यूमर हे सामान्यत शस्त्रक्रियेद्वारे काढले जातात. सहा वर्षांपेक्षा लहान रुग्णांसाठी ही प्रकिया आव्हानात्मक आहे. नाकातून शस्त्रक्रिया झाल्यास डोक्याची कवटी उघडणे आणि मेंदूतून काढणे टाळले जाते. एखाद्या लहान रुग्णांवर मुक्त शस्त्रक्रिया केल्याने त्यांच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो, असे डॉक्टर सुशांत यांनी सांगतिले. यापूर्वी अमेरिकेत 2 वर्षांच्या एका लहान मुलांवर अमेरिकेतील स्टेनफोर्डमध्ये असे ऑपरेशन करण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details