कोची : राष्ट्रीय तपास संस्थेने ( National Investigation Agency ) 22 सप्टेंबर रोजी सादर केलेल्या अहवालात दावा केला आहे की, पीएफआय संघटनेने हिंसक जिहादचा एक भाग म्हणून दहशतवादी कृत्य करून भारतात इस्लामिक राज्य स्थापन करण्याचा कटही रचला होता. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ( Popular Front of India ) आणि त्यांच्या नेत्यांच्या कार्यालयांवर देशव्यापी छाप्यांदरम्यान जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये एका विशिष्ट समुदायाच्या प्रमुख नेत्यांना लक्ष्य करणारी अत्यंत आक्षेपार्ह साहित्य, दस्तऐवज सापडले आहेत.
NIA ON PFI : भारतात इस्लामिक राज्य स्थापन पीएफआयचा कट, एनआयच्या अहवालात दावा - पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया
राष्ट्रीय तपास संस्थेने ( National Investigation Agency ) दावा केला आहे की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ( Popular Front of India ) या संघटनेने हिंसक जिहादचा एक भाग म्हणून दहशतवादी कृत्य करून भारतात इस्लामिक राज्य स्थापन करण्याचा कट रचला होता. पीएफआयने भारताविरुद्ध असंतोष पसरविल्याचेही पुरावे त्यात मिळाले आहेत.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ( Popular Front of India ) आणि त्यांच्या नेत्यांच्या कार्यालयांवर देशव्यापी छाप्यांदरम्यान जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये एका विशिष्ट समुदायाच्या प्रमुख नेत्यांना लक्ष्य करणारी अत्यंत आक्षेपार्ह साहित्य, दस्तऐवज सापडले आहेत. एनआयएच्या विशेष न्यायालयासमोर एका गुन्ह्याच्या संदर्भात 10 जणांना ताब्यात घेण्यासाठी सादर केलेल्या रिमांड अहवालात, एजन्सीने असा आरोप केला की, या कट्टरपंथी इस्लामी संघटनेने तरुणांना लष्कर-ए-तैयबा आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराकसह दहशतवादी गटांमध्ये सामील होण्यास प्रोत्साहित केले.
एनआयएच्या अहवालात म्हटले आहे की, पीएफआय राज्य आणि तेथील यंत्रणांविरुद्ध द्वेष निर्माण करण्यासाठी लोकांच्या विशिष्ट वर्गामध्ये सरकारी धोरणांचा चुकीचा अर्थ लावून भारताविरुद्ध असंतोष पसरवते.