महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पेट्रोलचे दर पुन्हा वाढले, डिझेलचे दर स्थिर

आज (दि. 17 जुलै) पेट्रोलच्या दरामध्ये 30 ते 40 पैशांनी वाढ झाली आहे. मात्र, डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही.

By

Published : Jul 17, 2021, 3:50 PM IST

Updated : Jul 17, 2021, 7:19 PM IST

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - इंधन (Fuel Price Updates) च्या दरात सतत चढ-उतार होत आहे. दिल्लीत शनिवारी (दि. 17 जुलै) पुन्हा पेट्रोलचे भडकले आहे. दिलासादायक बाब म्हणजे डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात 30 पैशांची वाढ झाली असून 101.9 रुपये प्रति लिटर इतके पेट्रोलचे दर झाले आहेत तर डिझेलची किंमत 89.93 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे.

देशात मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 107.89 रुपये, कोलकाता मध्ये 102.14 रुपये आणि चेन्नईमध्ये 102.55 रुपये प्रति लिटर आहे. डिझेलच्या दरामध्ये कोणतीही वाढ झाली नाही. मुंबईमध्ये डिझेलचे दर 97.51 रुपये, कोलकातामध्ये 93.08 रुपयेआणि चेन्नईमध्ये 94.44 रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोलच्या किंमती

शहर कालचे दर आजचे दर
दिल्ली 101.6 101.9
मुंबई 107.6 107.89
कोलकाता 101.8 102.14
चेन्नई 102.28 102.55

सीएनजी वाहनांच्या विक्रीत वाढ

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असल्याचे सीएनजीकडे अनेक जण वळत आहेत. त्यामुळे सीएनजी वाहनाच्या विक्रीत वाढ झाली आहे. पण, सीएनजीच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिल्लीमध्ये सीएनजीचे दर 44.30 रुपये प्रति किलोग्रॅम इतके झाले आहे.

हेही वाचा -व्हॉट्सअपचा दणका! एकाच महिन्यात बंद केली 20 लाख भारतीयांची अकाउंट

Last Updated : Jul 17, 2021, 7:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details