महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Petrol Prices Hiked : चार दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात 2.40 रुपयांनी वाढ - दरवाढीचा सर्वसामांन्यांना फटका

मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 80 रुपयांनी वाढले (Petrol and diesel prices were hiked by Rs 80 each) आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2.40 रुपयांची वाढ (Petrol, diesel prices hiked by Rs 2.40 in four days) झाली आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामांन्य नागरिकांना (Rising prices hit everyone) सहन करावा लागत आहे.

Petrol Prices Hiked
पेट्रोलचे दर वाढले

By

Published : Mar 25, 2022, 1:00 PM IST

नवी दिल्ली :देशभरात तिसऱ्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 97.81 रुपये आणि 89.07 रुपये प्रति लिटर असेल. मुंबईत पेट्रोलचे दर 84 पैशांनी वाढले असून, ते 112.51 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे आणि 85 पैशांच्या वाढीनंतर डिझेलचे दर प्रतिलिटर 96.70 रुपये झाले आहेत.

चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 76 पैशांनी वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 103.67 रुपये आणि डिझेल 93.71 रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात 84 पैशांच्या वाढीनंतर पेट्रोलचा दर 106.34 रुपये प्रति लीटर झाला आहे आणि डिझेल 80 पैशांच्या वाढीनंतर 91.42 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. चार महिन्यांच्या विरामानंतर चार दिवसांतील ही तिसरी वाढ आहे. मंगळवार आणि बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 80 पैशांनी वाढ झाली.

याआधी गुरुवारी, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या दरात प्रति किलो 1 रुपयांची वाढ केली. दिल्लीत एक किलो सीएनजीची किंमत 59.01 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. IGL ने घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) च्या किमतीत गुरूवारपासून प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटर (SCM) 1 रुपयांनी वाढ केली आहे.

हेही वाचा :Kejriwal On 'The Kashmir Files'...तर 'द कश्मीर फाईल्स युट्युबर टाका; केजरीवाल यांचे भाषण व्हायरल

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details