नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Prices ) बुधवारी प्रत्येकी 80 पैशांनी वाढ (Petrol, diesel prices hiked by 80 paise again) झाली असून, गेल्या नऊ दिवसांतील एकूण दरांमध्ये वाढ होऊन ते 5.60 रुपये प्रति लिटर (Total growth reached 5.60 paise) झाली आहे. तर मुंबईत पेट्रोल 84 आणि डिझेल 85 ने वाढले आहे. त्यामुळे मुंबईतील एकून दरात 9 दिवसात 76 पैशाची वाढ झाली आहे. किरकोळ विक्रेत्यांच्या किंमतीच्या अधिसूचनेनुसार दिल्लीत पेट्रोलची किंमत आता प्रति लिटर 101.1 रुपये असेल तर डिझेलचे दर 91.47 रुपये प्रति लिटरवरून 92.27 रुपये झाले आहेत. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 115.88 रुपये आणि 100.10 रुपयांवर पोचले आहेत. डिझेलच्या दरांनी प्रथमच शंभरी पार केली आहे.
Petrol Diesel Prices : पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा 85 पैशांनी वाढले; एकूण वाढ पोचली 5.76 पैशांवर
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Prices ) दररोज वाढ (Daily increase) होताना पहायला मिळत आहे. बुधवारी पेट्रोल 84 पैशांनी तर डिझेल 85 वाढले (Petrol, diesel prices hiked by 85 paise again) आहे. त्यामुळे 9 दिवसातील एकुण वाढ 5.76 पैशांवर पोचली आहे (Total growth reached 5.76 paise) तर दिल्लीत ते 80 पैशांनी वाढले आहे त्यामुळे मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 115.88 रुपये आणि 100.10 रुपये तर दिल्लीत अनुक्रमे 101.01 रुपये प्रति लिटर आणि 92.27 रुपये प्रति लिटर या प्रमाणात वाढले आहेत.
देशभरात दर वाढवले गेले आहेत आणि स्थानिक कर आकारणीवर ते अवलंबून असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी हे दर वेगवेगळे असू शकतात. 22 मार्च रोजी साडेचार महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर किमतींमध्ये झालेली ही नववी वाढ आहे. मंगळवारी पेट्रोलच्या दर पुन्हा प्रतिलिटर 85 पैशांनी आणि डिझेलचे दर 75 पैशांनी वाढले होते, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी 4 नोव्हेंबरपासून किमती स्थिर ठेवण्यात आल्या होत्या. मधल्या काळात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यानंतरही भाव स्थिर ठेवण्यात आले होते त्यावेळी झालेला तोटा भरुन काढण्यासाठी सध्या पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे.