नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol and diesel rates) शनिवारी प्रत्येकी 85 पैशांनी वाढ झाली असून, गेल्या 12 दिवसांतील ही दहावी दरवाढ (10th price hike in 12 days)आहे. किरकोळ विक्रेत्यांच्या किमतीच्या अधिसूचनेनुसार, मुंबईत पेट्रोल 117.57 रुपये तर डिझेल 101.79 रुपयांवर पोचले आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत आता 101.81 रुपयांच्या तुलनेत प्रति लिटर 102.61 रुपये असेल, तर डिझेलचे दर 93.07 रुपये प्रति लिटरवरून 93.87 रुपये झाले आहेत.
Rates of petrol, diesel : पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा 85 पैशांनी वाढले; 12 दिवसांत 10वी दरवाढ - पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा 85 पैशांनी वाढले; 12 दिवसांत 10वी दरवाढ
मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol and diesel rates) प्रति लिटर 85 पैशांनी वाढले आहेत त्यामुळे आता पेट्रोल 117.57 रुपये तर डिझेल 101.79 रुपयांवर पोचले आहे. दिल्लीत आज पेट्रोल (Petrol ) आणि डिझेलचे (Diesel) दर 80 पैशाने वाढुन अनुक्रमे 102.61 रुपये प्रति लिटर आणि 93.87 रुपये प्रति लिटर असे झाले आहेत. 22 मार्च रोजी दर सुधारणेतील साडेचार महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर 12 दिवसातली 10वी (10th price hike in 12 days) वाढ आहे.
![Rates of petrol, diesel : पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा 85 पैशांनी वाढले; 12 दिवसांत 10वी दरवाढ Rates of petrol, diesel](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14905987-574-14905987-1648864171471.jpg)
पेट्रोल, डिझेलचे दर
पेट्रोल डिझेलचे दर देशभरात वाढवले गेले आहेत. प्रत्येक राज्यानुसार स्थानिक कर आकारणीवर दर अवलंबून असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी ते वेगवेगळे असु शकतात. 22 मार्च रोजी दर सुधारणेतील साडेचार महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर ही 10वी वाढ आहे. शुक्रवारी, जेट इंधनाच्या किमतीही 2 टक्क्यांनी वाढल्या, या वर्षातील या इंधनाची ही सलग सातवी दरवाढ आहे. एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF), विमानांच्या उड्डाणासाठी लागते हे इंधन 2 टक्क्यांनी वाढले आहे.