नवी दिल्ली: उत्तर प्रदेश आणि पंजाब सारख्या राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी म्हणजे 4 नोव्हेंबरपासून देशभरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती (Rates of petrol and diesel) स्थिर ठेवण्यात आल्या होत्या. त्या दरम्यान कच्च्या तेलाचे दर वाढल्या नंतरही किंमती स्थिर ठेवण्यात आल्या. त्याचा फटका आता पहायला मिळत आहे. 22 मार्च रोजी दर सुधारणेतील साडेचार महिन्यांचा दीर्घ कालावधी संपल्यानंतर किमतींमध्ये झालेली ही पाचवी वाढ आहे. आठवडा भरात या किंमती आजच्या वाढीपुर्वी चार वेळा वाढल्या आहेत. चौथी दरवाढ थेट प्रति लिटर 80 पैशांनी वाढल्या होत्या. आज पाचव्यांदा झालेल्या दरवाढी मुळे सहा दिवसात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 3.70 रुपयांनी तर डिझेलचे दर 3.75 रुपयांनी वाढले आहेत.
10 मार्च रोजी मतमोजणी झाल्यानंतर पेट्रोल डिझेलचे दर वाढणे अपेक्षित होते, मात्र विरोधकांनी या विषयावर टीका केल्यामुळे दोन आठवड्यांनी दरवाढ करण्यास सुरवात केली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत 137 दिवसांच्या अंतरात सुमारे USD 82 प्रति बॅरल वरून USD 120 पर्यंत वाढल्या तसेच किरकोळ किमतीतील वाढ झाली. परंतु सरकारी मालकीचे इंधन विक्रेते इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम. कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी आता टप्प्याटप्प्याने आवश्यक भाव वाढ सुरु केली आहे.