महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Petrol Price : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेलचे दर? - पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

गेल्या दीड महिन्यांपासून इंधन दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी पातळीवर आहेत. याशिवाय देशातील अनेक शहरांमध्ये किंमती पेट्रोलचे दर 105 रुपयांच्या पुढे गेले आहेत. तर मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 104 रुपये आहेत. गेल्या 4 मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सतत वाढ होत आहे.

petrol and diesel  price
पेट्रोल, डिझेलचे दर

By

Published : Jul 1, 2021, 1:25 PM IST

मुंबई -जुलैच्या पहिल्या दिवशी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. काल म्हणजेच बुधवारीदेखील किंमतींमध्ये कोणतीही वाढ झाली नव्हती. तथापि, आंतरराष्ट्रीय बाजारात लवकरच कच्च्या तेलाच्या किंमती वाढणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काल आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली नाही. त्यामुळे आज इंधनाचे दर वाढलेले नाहीत.

गेल्या दीड महिन्यांपासून इंधन दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी पातळीवर आहेत. याशिवाय देशातील अनेक शहरांमध्ये किंमती पेट्रोलचे दर 105 रुपयांच्या पुढे गेले आहेत. तर मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 104 रुपये आहेत. गेल्या 4 मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सतत वाढ होत आहे.

1 जुलै 2021 रोजी पेट्रोल-डिझेलचे दर -

शहर पेट्रोल डिझेल
दिल्ली 98.81 89.18
मुंबई 104.90 96.72
चेन्नई 99.80 93.72
कोलकाता 98.64 92.03
जयपूर 105.54 98.29
लखनऊ 95.97 89.59
भोपाळ 107.07 97.93
पाटणा 100.81 94.52

पेट्रोल आणि डिझेलवरील कराचे दर राज्यात वेगवेगळे -

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतर सर्व दर जोडल्याने इंधनाची किंमती जवळजवळ दुप्पट होते. देशाला 89 टक्के कच्चे तेल आयात केले जाते. म्हणूनच जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतीमध्ये चढ-उतार होतो. तेव्हा भारतातील तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होते. तेलाच्या किंमती वाढण्यामागे प्रामुख्याने दोन कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती आणि केंद्र व राज्ये यांच्याकडून उच्च कर दरात वाढ. पेट्रोल आणि डिझेलवरील कराचे दर राज्यात वेगवेगळे असतात.

वाढत्या इंधन दरासाठी जबाबदार कोण?

कोविड संकटाच्या या काळात जणू जखमेवर मीठ चोळण्याचे कामच सध्या होत आहे. पेट्रोलवर मोठा कर लावल्याने जनता अडचणींच्या खोल भोवऱ्यात अडकत आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे देशभरात नाराजी आहे. पंतप्रधान मोदींनी एलपीजीला जीएसटी अंतर्गत आणण्याची आपल्या सरकारची बांधिलकी व्यक्त केली. पेट्रोल आणि डिझेलदेखील जीएसटीखाली आणण्याची मागणी संसदेमध्ये होत आहे. 2008 साली जेव्हा कच्च्या तेलाच्या एका बॅरलची किंमत 150 डॉलर होती, तेव्हा एक लिटर पेट्रोलची किंमत 50 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 35 रुपये होती. आता, जेव्हा कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 75 डॉलर्स आहे, तेव्हा इंधनाचे दर उच्चांकी का आहेत?, असा सवाल नागरिक करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details