महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Parrot Missing Report in Police : अजबच! पोपट पिंजऱ्यातून उडून गेल्याने मालक संतप्त, थेट पोलिसात तक्रार दाखल - पोपट हरविल्याने पोलिसांचा शोध सुरू

- जगदलपूर शहरातील रहिवासी मनीष ठक्कर यांनी सिटी कोतवालीला हरवलेल्या अर्जाद्वारे पोपट शोधून ( absconding parrot in jagdalpur ) आणण्याचे आवाहन केले आहे. मालकाने सांगितले की, तो पोपट नेहमी पिंजऱ्यात ठेवत असे. पण 1 दिवसांपूर्वी पिंजरा उघडल्यावर तो संतापला. कारण, पोपट हा उडून गेला होता.

Parrot Missing Report in Police
पोपट पिंजऱ्यातून उडून गेल्याची पोलिसात तक्रार

By

Published : May 13, 2022, 7:25 PM IST

Updated : May 13, 2022, 8:11 PM IST

जगदलपूर - पोलिसांना कोणती कामे करावी लागतात, हा प्रश्न तुम्हाला पडावा अशीच ही बातमी आहे. छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात पोपट हरवल्याची तक्रार ( Pet parrot escapes from cage ) दाखल करण्यात आली आहे. मालकाने पोलिसांना सांगितले आहे की, त्याने पोपटाचे पालनपोषण मोठ्या आपुलकीने केले होते. पण तो पोपट कृतघ्न निघाला. पिंजरा उघडताच पोपट रागाने उडून गेला. तक्रारीनंतर पोलिसांनी पोपटाचा शोध सुरू ( police Complaint absconding parrot ) केला आहे.

पोपट शोधून आणण्याची अनोखी तक्रार- जगदलपूर शहरातील रहिवासी मनीष ठक्कर यांनी सिटी कोतवालीला हरवलेल्या अर्जाद्वारे पोपट शोधून ( absconding parrot in jagdalpur ) आणण्याचे आवाहन केले आहे. मालकाने सांगितले की, तो पोपट नेहमी पिंजऱ्यात ठेवत असे. पण 1 दिवसांपूर्वी पिंजरा उघडल्यावर तो संतापला. कारण, पोपट हा उडून गेला होता.

पोपट निघाला कृतघ्न -पोपटाचे मालक मनीष ठक्कर ( Manish Thakkar Complained to police ) यांनी पोलिसांना सांगितले की, पोपटाचे पालनपोषण कुटुंबीयांनी प्रेमाने केले. गेल्या 7 वर्षांपासून तो सकाळ संध्याकाळ कुटुंबाप्रमाणे तिची काळजी घेत असे. लाडाचा परिणाम असा झाला की पोपटाने सगळ्यांना ताशेरे दाखवायला सुरुवात केली होती.

पोलीस पोपटाच्या शोधात - जगदलपूर शहर कोतवाली प्रभारी इमान साहू यांनी सांगितले की, "या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली आहे. शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. शहरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून लवकरच पोपटाचा शोध घेण्यात येणार आहे. त्यानंतर पोपट त्याच्या मालकाच्या ताब्यात देण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा-Shimla Car Accident Viral Video : कारच्या पादचाऱ्याला धडक, सीसीटीव्हीत कैद झालेला व्हिडिओ व्हायरल

हेही वाचा-Congress Chintan Shibir : द्वेष पसरवून केंद्र सरकारची अल्पसंख्याकांवर दडपशाही - सोनिया गांधी

हेही वाचा-AAP MLA Amanatullah khan : दिल्लीतील आपचे आमदार अमानतुल्ला खान अडचणीत.. दिल्ली पोलिसांकडून गुंड म्हणून घोषणाा

Last Updated : May 13, 2022, 8:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details