महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Minister Muraleedharan House Vandalised : केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन यांच्या घराची तोडफोड करणाऱ्याला अटक - व्ही मुरलीधरन यांच्या घराची तोडफोड

परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांच्या केरळमधील घराची तोडफोड करून खळबळ उडवून देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. हल्लेखोर हा मानसिक रुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे.

Minister Muraleedharan
मंत्री व्ही मुरलीधरन

By

Published : Feb 12, 2023, 3:08 PM IST

त्रिवेंद्रम (केरळ) : परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांच्या घराची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला शनिवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. आरोपी मनोज हा केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील पय्यानूरचा रहिवासी आहे. त्याला थाम्पनूर रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मनोज मानसिकदृष्ट्या अस्थिर असून त्याचे विधान परस्परविरोधी आहे.

हल्ल्यात झालेल्या दुखापतीमुळे शोधण्यात मदत : मनोज हॉटेलच्या कामानिमित्त त्रिवेंद्रमला आला होता. हा हल्ला गेल्या शुक्रवारी कोचल्लूर सुब्रमण्यम स्वामी मंदिराजवळ 'मकाईराम' नावाच्या घरात झाला. येथे मंत्री त्रिवेंद्रम मध्ये आले तेव्हा राहत असत. हल्लेखोर मनोजने घराच्या समोरील काचा फोडल्या तसेच घराचा दरवाजा देखील दगडाने तोडला. त्याने घराच्या मागच्या बाजूनेही वर जाण्याचा प्रयत्न केला. यात तो जखमी झाला. घटनेच्या वेळी मंत्री किंवा कर्मचारी दोघेही घरात नव्हते. घराच्या समोरच्या पोर्चवर रक्त सांडलेले होते. हल्ल्यात झालेल्या दुखापतीमुळे पोलिसांना मनोजला त्वरीत शोधण्यात मदत झाली.

भाजपचा पोलिसांवर आरोप : भारतीय जनता पक्षाने या घटनेसाठी पोलिसांच्या निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष व्ही.व्ही.राजेश यांनी आरोप केला की, हल्लेखोर कोण आहेत आणि या घटनेमागे राजकीय शत्रुत्व आहे का, हे स्पष्ट करणे पोलिसांचे काम आहे. केंद्रीय मंत्री मुक्कामासाठी जेव्हा राजधानीत येतात तेव्हा केरळ पोलिस त्यांना पुरेसे पोलिस संरक्षण देत नाहीत, असा आरोपही राजेश यांनी केला.

ओडिशातही मंत्र्याची हत्या : अलीकडेच ओडिशात राज्याचे आरोग्य मंत्री नब किशोर दास यांची एका पोलिसाने गोळ्या झाडून हत्या केली होती. तपासादरम्यान आरोपी पोलिस कर्मचाऱ्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे आढळून आले होते. ओडिशाच्या झारसुगुडा जिल्ह्यातील ब्रजराजनगरजवळील गांधी चौकात ही घटना घडली होती. गोळी लागल्याने नबा दास गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना भुवनेश्वरच्या अपोलो रुग्णालयात हलवण्यास सांगितले. एवढे करूनही त्यांना वाचवता आले नाही. एका कार्यक्रमाला जात असताना हा हल्ला झाला. गोळीबार 'पूर्वनियोजित' होता अशी भीती व्यक्त केली जात आहे कारण मंत्र्यावर जवळून गोळी झाडण्यात आली होती. या कृत्यात एक सहायक उपनिरीक्षक सहभागी होता. गोपाल दास नावाचा सहाय्यक उपनिरीक्षक गांधी चक येथे तैनात होता. त्याने मंत्री नाबा दास यांच्यावर रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. भोई यांच्या म्हणण्यानुसार एएसआयने मंत्र्यांवर गोळीबार का केला याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा : Notice To Bajrang Bali : हे देवा..! चक्क बजरंग बलीलाच अतिक्रमणाची नोटीस!

ABOUT THE AUTHOR

...view details