पणजी- दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यानंतर देशातील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गोव्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बाहेर फिरायला जाणाऱ्या मुलींबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर सर्वस्तरातून टीका करण्यात येत आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री सावंत यांनी विधानसभेत वादग्रस्त विधान केले. रात्रीच्या वेळी मुली समुद्रकिनारी फिरत असतील तर त्यांच्या पालकांनी आत्मपरीक्षण करावे, असे मुख्यमंत्री सावंत विधानसभेत म्हणाले होते. त्यावरून विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. गोव्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे गोवा काँग्रेसचे प्रवक्ते अल्टोन डी कॉस्टा यांनी गुरुवारी सांगितले. पुढे ते म्हणाले, की आम्ही रात्री फिरण्यासाठी का घाबरावे? गुन्हेगारांनी तुरुंगात असायला पाहिजे. तर कायद्याचे पालन करणाऱ्या ग्राहकांनी मुक्तपणे बाहेर फिरले पाहिजे.
गोव्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह-
गोवा महिला काँग्रेसने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले आहे. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे. गोवा महिला काँग्रेसचे अध्यक्ष वीणा नाईक म्हणाल्या, की गोवा शांतीप्रिय राज्य आहे. मात्र, जेव्हापासून राज्यात भाजप सरकार आले आहे, तोपर्यंत गोव्यात भीतीचे वातावरण आहे. राज्यातील गुन्हेगार हे बिनधास्तपणे गुन्हे करत आहेत.
आम आदमी पक्षाच्या नेत्या अनुराधा गावडे म्हणाल्या, की आठवड्याला महिलांच्या विरोधात केलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण 4 टक्के आहे. गोव्यातील महिलांच्या सुरक्षेकरिता कायदा नाही का ? गोव्यातील महिला सुरक्षित नाहीत का ? असा गावडे यांनी प्रश्न उपस्थित केला.
हेही वाचा-कास्टिंग काऊच प्रकरण : नवोदित अभिनेत्रीने सांगितला 'त्या' दिवशीचा थरारक अनुभव
प्रमोद सावंत काय म्हणाले होते?
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, की आपण पोलिसांना थेट दोष देतो. मात्र, 10 तरुणी या समुद्रकिनारी पार्टी करण्यासाठी जातात. त्यामधील चार तरुणी रात्रभर समुद्रकिनारी राहतात. तर सहा तरुणी घरी परतात. मुद्रकिनाऱ्यावर दोन मुले आणि मुली रात्रभर होते. लहान मुलांनी विशेषत: अल्पवयीन मुलांनी समुद्रकिनारी वेळ घालवू नये. चारही आरोपींना अटक केल्याचा मुख्यमंत्री सावंत यांनी विधानसभेत सांगितले.
हेही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ई-रुपी लाँच, जाणून घ्या, डिजीटल देयकाबाबतची सविस्तर माहिती