चमोली (उत्तराखंड) : उत्तराखंडमधील जोशीमठ शहर सध्या आपले अस्तित्व वाचवण्यासाठी लढाई लढत आहे. अशा परिस्थितीत आता येथील स्थानिक लोकांचा संतापही वाढत आहे. बेघर लोकांचा रोष प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर निघत आहे. जोशीमठ येथे पोहोचलेले उत्तराखंड भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट (bjp state president mahendra bhatt) यांनाही आपत्तीग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले. (people protest against bjp state president). (Joshimath Sinking).
महेंद्र भट्ट यांच्या विरोधात घोषणाबाजी : उत्तराखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र प्रसाद भट्ट बाधित भागाची पाहणी करण्यासाठी जोशीमठ येथे पोहोचले. तेव्हा लोकांनी त्यांना घेराव घातला आणि संताप व्यक्त केला. महेंद्र भट्ट लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण स्थानिक लोकं त्यांचे काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. संतप्त लोकांनी महेंद्र भट्ट यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही भाजप कार्यकर्त्यांनी महेंद्र भट्ट यांना कसेबसे गर्दीपासून दूर नेले.