मेष: चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज नवीन कामाला यशस्वीपणे सुरुवात करू शकाल. आज आपण गूढ विद्या किंवा एखादा रहस्यमय विषय समजून घेण्याचा प्रयत्न कराल. दुपारनंतर प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. व्यापार - व्यवसायात सावध राहावे लागेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. संततीच्या बाबतीत मात्र आपली द्विधा मनःस्थिती होईल. Daily horoscope 25 November 2022
वृषभ:चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदाने व मित्रभेटीने होईल. नवीन ओळखी होतील. एखाद्या सहलीचे आयोजन यशस्वीपणे करू शकाल. परंतु दुपार नंतर वाद होण्याची शक्यता असल्याने बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. गूढ विषयांची आवड निर्माण होईल.
मिथुन: चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आज कौटुंबिक वातावरण उल्हासमय राहील. शारीरिक स्फूर्ती व मानसिक प्रसन्नता लाभेल. अपूर्ण कामे पूर्णत्वास गेल्याने आनंदात वाढ होईल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आर्थिक लाभ संभवतात. दुपार नंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी व्हाल. स्वकीय व मित्रांसह हिंडण्या - फिरण्याची व प्रेक्षणीय स्थळी जाण्याची संधी मिळेल. समाजात मान - सन्मान प्राप्त झाल्याने मन आनंदित होईल.
कर्क: चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आजचा दिवस भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास अनुकूल आहे. एकाग्रतेने काम केल्यामुळे कामात यश जरूर मिळेल. वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबात शांतता नांदेल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साह व प्रसन्नतेचा अनुभव येईल. अपूर्ण कामे तडीस जातील. व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.
सिंहःचंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज शारीरिक व मानसिक दृष्टया अस्वस्थता जाणवेल. आईच्या प्रकृतीची चिंता राहील. आर्थिक हानी होऊ शकते. तरीही दुपार नंतर आर्थिक योजनांवर विचार कराल. परिश्रमानुरूप फळ मिळेल. विद्यार्थ्यांना यश प्राप्ती होईल. वाद होण्याच्या शक्यतेमुळे बौद्धिक चर्चा टाळणे हितावह राहील. नवे कार्य हाती घेण्यात अडचणी येतील. सट्टा- जुगारात नुकसान संभवते.
कन्या: चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आजचा दिवस भाग्यवर्धक आहे. आज अनेक लाभ होतील. आप्तांकडून काही लाभ संभवतो. आपसातील संबंधात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल. परंतु दुपार नंतर काही ना काही कारणाने आपण चिंतीत व्हाल व त्याचा प्रतिकूल परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होईल. आप्तांच्या बाबतीत एखादा दुःखद प्रसंग घडण्याची शक्यता आहे. मातेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अपघाताची शक्यता असल्याने शक्यतो जलाशयापासून दूर राहावे.