महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

...तर महाराष्ट्रासह केरळच्या नागरिकांना कर्नाटक प्रवेश बंद - कर्नाटक आरोग्यमंत्री न्यूज

केरळमध्ये दररोज सरासरी ४ हजार ते ५ हजार नवीन कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. जर आरटी-पीसीआरची निगेटिव्ह चाचणीचे प्रमाणपत्र नसेल तर दोन्ही राज्यातील नागरिकांना कर्नाटकमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

Karnatak health Minister
कर्नाटक आरोग्यमंत्री के. सुधाकर

By

Published : Feb 20, 2021, 6:05 PM IST

Updated : Feb 20, 2021, 6:25 PM IST

बंगळुरू- महाराष्ट्र व केरळ या राज्यांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केरळ व महाराष्ट्रातील नागरिकांना कोव्हिड नेगिटीव्हचे प्रमाणपत्र असल्याशिवाय कर्नाटकमध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी काढले आहे.

हेही वाचा-'निधी मिळत नसल्याने कोरोनाबधितांवर मोफत अंत्यसंस्कार करणार नाही'

कर्नाटकमध्ये दक्षिण आफ्रिका अथवा ब्राझीलमधीन कोरोनाचा नवा प्रकार आढळला नसल्याचे आरोग्यमंत्री के. सुधारक यांनी सांगितले. ते म्हणाले की, महाराष्ट्र आणि केरळच्या राज्यालगत सीमा आहेत. तिथे कोरोनाचा नवीन प्रकार आढळला आहे. तसेच तेथील रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर परिपत्रक काढले आहे.

तर महाराष्ट्रासह केरळच्या नागरिकांना कर्नाटक प्रवेश बंद

हेही वाचा-कोरोना विषाणूचा परदेशी स्ट्रेन नाही, मात्र स्पष्टता येण्याची गरज - आयएमए

पुढे के. सुधारक म्हणाले की, केरळमध्ये दररोज सरासरी ४ हजार ते ५ हजार नवीन कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. जर आरटी-पीसीआरची निगेटिव्ह चाचणीचे प्रमाणपत्र नसेल तर दोन्ही राज्यातील नागरिकांना कर्नाटकमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. कोरोनाच्या लसीकरणाचे महत्त्व सर्व आरोग्य कर्मचारी जाणून आहेत, अशी आशा असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

नव्या स्ट्रेनबाबत अद्याप पुष्टी नाही-

राज्यात सध्या अमरावती, बुलढाणा या विदर्भातील काही भागांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत असून रुग्ण संख्येमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती, बुलढाणा या भागात सापडत असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचा ब्राझील ब्रिटन किंवा दक्षिण आफ्रिकेतून आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन आहे की काय? अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, यात काहीही तथ्य नसल्याचे महाराष्ट्र सरकारने अधिकृत पत्रक जारी करत स्पष्ट केले आहे. सरकारने अधिकृत माहिती जाहीर करण्यामागील कारणे इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी संगितले आहे.

Last Updated : Feb 20, 2021, 6:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details