महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Pda Demolish Javed Pump House : प्रयागराज हिंसाचारातील मास्टरमाईंडचे बुलडोझरने पाडले घर, प्रशासनाची कारवाई - egg found on shivling

प्रयागराज हिंसाचार प्रकरणात मोहम्मद उर्फ ​​जावेद पंप हा मास्टरमाईंड ( Prayagraj violence mastermind Javed Pump ) आहे. जावेदचे घर करेलीच्या जेके आशियाना परिसरात आहे. तेथेही पीडीएने सर्वेक्षणाचे काम केले आहे. यासोबतच हिंसाचाराच सहभागी असलेल्या ३७ जणांची नावेही या दोन पानी यादीत आहेत. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अजूनही पीडीएची टीम बुलडोझर चालवत हल्लेखोरांच्या घरापर्यंत कारवाई करण्याची शक्यता आहे. याची सुरुवात कारली येथील हिंसाचाराचा सूत्रधार जावेद पंपचे घर पाडले आहे.

Pda Demolish Javed Pump House
मास्टरमाईंडचे बुलडोझरने पाडले घर

By

Published : Jun 12, 2022, 2:05 PM IST

Updated : Jun 12, 2022, 6:59 PM IST

प्रयागराज- प्रयागराजमध्ये शुक्रवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा सूत्रधार जावेद पंपाच्या घरावर प्रशासनावर बुलडोझर चालविला. यावेळी प्रयागराजाची टीमदेखील उपस्थित आहे. जावेद पंप याचे घर कारेलीच्या जेके आशियाना परिसरात आहे. पीडीएकडून नकाशा मंजूर न करता जावेदचे घर नियमाविरुद्ध ( prayagraj violence case ) बांधले आहे. या कारणास्तव रविवारी घर पाडण्यात आले. तोडफोडीच्या कारवाईपूर्वी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यासोबतच अधिकाऱ्यांनी पोलिसांना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे.

प्रयागराज हिंसाचार प्रकरणात मोहम्मद उर्फ ​​जावेद पंप हा मास्टरमाईंड ( Prayagraj violence mastermind Javed Pump ) आहे. जावेदचे घर करेलीच्या जेके आशियाना परिसरात आहे. तेथेही पीडीएने सर्वेक्षणाचे काम केले आहे. यासोबतच हिंसाचाराच सहभागी असलेल्या ३७ जणांची नावेही या दोन पानी यादीत आहेत. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अजूनही पीडीएची टीम बुलडोझर चालवत हल्लेखोरांच्या घरापर्यंत कारवाई करण्याची शक्यता आहे. याची सुरुवात कारली येथील हिंसाचाराचा सूत्रधार जावेद पंपचे घर पाडले आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक ​​प्रयागराज प्रेम प्रकाश यांनी शुक्रवारीच सांगितले होते की ज्यांनी हिंसाचाराचा कट रचला त्यांची चौकशी केली जात आहे. तपासात ज्यांचा सहभाग असेल, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

प्रयागराजमध्ये वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न-प्रयागराजमध्ये शुक्रवारी नमाजानंतर झालेल्या गोंधळानंतर पुन्हा एकदा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात ( prayagraj friday prayers ) आला. येथील शिवकुटी येथील प्रसिद्ध कोटेश्वर महादेव मंदिराच्या शिवलिंगावर काही अज्ञातांनी अंडी ठेवली ( egg found on shivling ) होती. ती अंडी एका भक्ताने पाहिली. त्यानंतर त्यांनी पुजार्‍याला सांगितले आणि तेथून अंडी फेकून दिली. मंदिराच्या पुजाऱ्याने ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून धार्मिक उन्माद पसरवल्याचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Last Updated : Jun 12, 2022, 6:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details