नालंदाTheft Nalanda Hospital : बिहारमधील नालंदा सदर रुग्णालयातून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. 25 सप्टेंबर रोजी नालंदा येथे एक भीषण रस्ता अपघात झाला होता. ज्यात चार जणांचा मृत्यू झाला होता, तर तिघांची प्रकृती चिंताजनक होती. जखमींवर बिहार शरीफ सदर रुग्णालयात उपचार सुरू असताना जखमींचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर नागगरिक संतप्त झाले आहेत.
मृतदेहावरचे दागिने चोरले : नालंदा सदर रुग्णालयात एक व्यक्ती गेली पाच वर्षे मोफत जेवण, उपचार घेऊन आपलं जीवन जगत होता. मात्र यादरम्यान या व्यक्तीला मृतदेहावरचे दागिने चोरताना रंगेहात पकडण्यात आलं. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. सदर रुग्णालयाच्या उपअधीक्षकांनी सांगितलं की, त्या व्यक्तीनं त्याच्याकडं राहण्याची, जेवणाची व्यवस्था नसल्याचं सांगितलं. याशिवाय त्याला गंभीर आजार असल्यानं त्याच्या मुलानं, सुनेनं त्याला तिला घरातून हाकलून दिलं होतं. दया दाखवून रुग्णालय व्यवस्थापनानं त्याला येथे राहण्याची परवानगी दिली. मात्र सोमवारी या रुग्णानं व्यावसायिक चोराप्रमाणे चोरी करण्यासाठी आपत्कालीन वॉर्ड गाठला. त्यानं तिथं मृत तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी तोडली.
"ही व्यक्ती तीन-चार वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये राहत आहे. सोडायला सांगितल्यावरही तो जात नसे. दोन-तीन तास हॉस्पिटलमधून बाहेर पडला, तरी तो परत येऊन सांगायचा की त्याला दम लागत आहे. अशाच गोष्टी सांगून तो रुग्णालयात राहायचा. जेवणाची, निवार्याची व्यवस्था नाही असे, तो म्हणायचा. तो आज मृतदेहातील दागिने चोरताना पकडला गेलाय. त्याला रुग्णालयानं बाहेर काढलं आहे. ही पहिलीच वेळ आहे. - डॉ. अशोक कुमार, उपअधीक्षक सदर रुग्णालय, नालंदा
चोरी करताना रंगेहात पकडले :ही व्यक्ती चोरी करत असताना तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला रंगेहात पकडलं. नंतर ते कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांच्या ताब्यात देण्यात आलं. चोरीच्या आरोपात पकडलेल्या या रुग्णाचं नाव प्रेमचंद प्रसाद असं असून तो मुख्यालय बिहार शरीफ येथील वॉर्ड क्रमांक 33 खंडक मोहल्लाचा रहिवासी आहे. तो सदर रुग्णालयात तीन-चार वर्षांहून अधिक काळ रुग्ण म्हणून दाखल होता.