महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bihar Hospital : बिहारमध्ये रुग्णाला मूत्रपिशवीऐवजी लावली कोल्ड्रींक्सची बाटली, जामुईतील धक्कादायक प्रकार - रुग्णाला मूत्रपिशवीऐवजी कोल्ड्रिंक्सची बाटली

बिहारच्या सरकारी रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रुग्णाला मूत्रपिशवीऐवजी कोल्ड्रिंक्सची बाटली लावल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे बिहार सरकारने राज्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत केलेले दावे फोल ठरल्याचे दिसून येत आहे.

Bihar Hospital
Bihar Hospital

By

Published : Aug 9, 2023, 3:49 PM IST

रमेश पांडे यांची प्रतिक्रिया

जमुई :रेल्वे अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला युरिन बॅगच्या जागी कोल्ड्रींक्सची बाटली लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बिहारमधील जमुई सदर रुग्णालयात उघडकीस आली आहे. बिहारच्या जमुई सदर रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्डमध्ये या रुग्णाला दाखल करण्यात आले होते. हा रुग्ण रेल्वे रुळावर पोलिसांना जखमी अवस्थेत आढळून आला होता.

लघवीच्या बॅगच्या जागी लावली कोल्ड्रींक्सची बाटली :एका 60 वर्षीय वृद्धाचा रेल्वे रुळावर अपघात झाला होता. या जखमी रुग्णाला झाझा पोलिसांनी जमुई सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र सदर रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर या रुग्णाला लघवीची पिशवी लावण्याऐवजी कोल्ड्रींक्सची बाटली लावल्याचा प्रकार घडला. ही घटना सदर रुग्णालयात आलेल्या नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली.

"गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात लघवीच्या पिशव्या संपल्या आहेत. लघवीच्या पिशव्यांऐवजी थंड पेयाच्या बाटल्यांचा वापर करणे ही गंभीर बाब आहे. याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य सेविकेवर कारवाई केली जाईल. - रमेश पांडे, हॉस्पिटल मॅनेजर, जमुई

जमुईची आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर :रुग्णाला लघवीच्या पिशवीऐवजी कोल्ड्रिंक्सची बाटली लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे जमुईतील आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडे पडले आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओची मोठी चर्चा होत आहे.

रुग्णालय व्यवस्थापकाने दिले चौकशीचे आदेश : सदर रुग्णालयात दररोज आरोग्य विभाग कोणत्या ना कोणत्या विषयामुळे चर्चेत असतो. लघवीच्या बॅगऐवजी कोल्ड्रींक्सची बाटली रुग्णाला लावणे ही अतिशय गंभीर बाब आहे. दुसरीकडे या प्रकरणाबाबत रुग्णालयाचे व्यवस्थापक रमेश पांडे यांनी सांगितले की, अनेक दिवसांपासून रुग्णालयातील लघवीच्या पिशव्या संपल्या आहेत. त्यामुळे लघवीच्या पिशवीऐवजी कोल्ड्रिंकची बाटली रुग्णाला लावणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर संबंधित आरोग्य सेविकेवर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar On Babri Masjid : बाबरी मशीदबाबत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले पंतप्रधान नरसिंह राव यांनी ठेवला विजया राजे सिंधियांच्या शब्दावर विश्वास अन् मग . . . .
  2. Narendra Modi Targets Opposition : पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल; भारत छोडो चळवळीतील स्वातंत्र्यवीरांना आदरांजली
  3. Rahul Gandhi in Parliament Updates :आम्ही शौचालयावर बोलतो, तेव्हा काँग्रेसचे खासदार हसतात- स्मृती इराणी

ABOUT THE AUTHOR

...view details