नवी दिल्ली : 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात ( Money laundering Case ) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा ( Actress Jacqueline Fernandez ) अंतरिम जामीन 15 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात ( Patiala House Court ) याप्रकरणी सुनावणी सुरू होती. तिहार तुरुंगातील आरोपी सुकेश चंद्रशेखरच्या खंडणी प्रकरणात जॅकलिनचे कनेक्शन समोर आले होते. गुरुवारी सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. आता 15 नोव्हेंबर रोजीच जामिनाचा आदेश सुनावण्यात येणार आहे.
अभिनेत्रीला का केले नाही अटक :जॅकलिनकडून जामिनाचा अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र या जामिनाला ईडीकडून विरोध करण्यात आला होता. जामिन मिळाल्यास जॅकलिन देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करू शकते, असा आरोप ईडीने लावला.आम्ही आमच्या संपूर्ण आयुष्यात 50 लाख रुपये रोख पाहिले नाहीत, परंतु जॅकलिनने मौजमजेसाठी 7.14 कोटी रुपये उडवले. तिने प्रत्येक युक्ती वापरून पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. कारण त्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे आहेत. असे ईडीने कोर्टात म्हटले आहे. जॅकलिनला आतापर्यंत अटक का केली नाही? इतर आरोपी तुरुंगात आहेत, मग अशावेळी अभिनेत्रीला का अटक केली नाही असा सवाल कोर्टाने यावेळी ईडीला केला.