महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Fire Breaks in Pathankot Express : 'त्या' रेल्वे कर्मचाऱ्यामुळे पठाणकोट एक्सप्रेसमधील आगीची मोठी दुर्घटना टळली, जाणून घ्या सविस्तर - आग्रा कॅन्ट

Fire Breaks in Pathankot Express : आग्रा-झाशी रेल्वे मार्गावरील पातालकोट एक्स्प्रेसच्या चार बोगींना बुधवारी दुपारी भीषण आग लागली. मात्र रेल्वे लेव्हल क्रॉसिंगवर तैनात असलेल्या गेटमनच्या सतर्कतेमुळं मोठा अपघात टळला.

Fire Breaks in Pathankot Express
Fire Breaks in Pathankot Express

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 8:04 AM IST

पठाणकोटएक्स्प्रेसच्या चार बोगींना भीषण आग

आग्रा Fire Breaks in Pathankot Express : भंडई स्थानकाजवळील एका रेल्वे लेव्हल क्रॉसिंगवर तैनात असलेले गेटमन यशपाल सिंग या सेवानिवृत्त सैनिक अधिकाऱ्यानं वेळीच सतर्कता दाखवली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. गेटमननं वरिष्ठांना सतर्क केल्यानं पठाणकोट एक्स्प्रेसच्या डब्यांना लागलेल्या आग वेळीच आटोक्यात आणता आली.

पठाणकोट रेल्वे भांडई स्थानकावर पोहोचण्यापूर्वी दुपारी 3.35 वाजता ट्रेन फाटकातून जात असताना सिंग यांना इंजिनपासून चौथ्या डब्यातून धूर निघत असल्याचं दिसलं. ट्रेनमधील कोणालाही याची माहिती नव्हती. त्यानंतर यशपाल यांनी ताबडतोब भंडई स्टेशनचे डेप्युटी स्टेशन सुपरिटेंडंट हरिदास यांना फोन केला. त्यांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिल्याचे सुत्रांनी सांगितलंय. यामुळं आगीला वेळीच आटोक्यात आणता आली.

पठाणकोट एक्सप्रेसच्या 4 डब्यांना आग :आग्रा-झाशी रेल्वे मार्गावरील पठाणकोट एक्स्प्रेसच्या चार बोगींनाबुधवारी दुपारी भीषण आग लागली. आग्रा कॅन्टच्या पुढील भंडई स्टेशनजवळ हा अपघात झाला. बोगींना आग लागल्यानं प्रवाशांमध्ये आरडाओरडा झाला. या घटनेत 9 प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर एसएन मेडिकल कॉलेज आणि सीएचसीमध्ये उपचार सुरू आहेत. याची माहिती मिळताच रेल्वेसह स्थानिक पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. या घटनेमुळं सुमारे १२ रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळित झाले. सर्वत्र गाड्या थांबवाव्या लागल्या. या आगीमुळं प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. बोगीतून उड्या मारून लोक धावू लागले. यामध्ये काही जण जखमीही झाले.

  • आगीचे कारण अस्पष्ट : पठाणकोट एक्स्प्रेसला लागलेल्या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. यासाठी रेल्वेनं चौकशी समिती स्थापन केलीय. सर्वात वर्दळीच्या मार्गावरील इतर गाड्यांच्या संचालनावर परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी काळजी घेण्यात आली. आगीच्या घटनेमुळं पठाणकोट एक्स्प्रेस सुमारे तीन तासांनंतर रवाना होऊ शकली. जनरल डब्याला आग लागली. त्यामुळं त्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्लीपरमध्ये हलवण्यात आलं. आगीत नुकसान झालेले डबे वेगळे करून ट्रेन पुढे नेण्यात आली.

हेही वाचा :

  1. Ahmednagar Burning Train Fire Video : अहमदनगरमध्ये 'द बर्निंग ट्रेनचा थरार'; पाहा धगधगत्या आगीचा व्हिडिओ...
  2. Tourism Train Coach Fire : पर्यटक रेल्वे गाडीच्या डब्याला आग, मदुराईत ९ प्रवाशांचा मृत्यू
  3. Robbery In Jammu Tawi Express : संबळपूर जम्मू तावी एक्सप्रेसमध्ये दरोडा; दरोडेखोरांच्या मारहाणीत अनेक प्रवासी जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details