नवी दिल्ली -वर्ष 2016 मध्ये पठाणकोट येथील हवाईदलाच्या तळावरच अतिरेक्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यावर एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. भ्रष्ट स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी जैशच्या अतिरेक्यांना हवाईदलाच्या तळावर घुसण्यासाठी मदत केली होती, असे खळबळजनक खुलासा या पुस्तकात करण्यात आला आहे. सुरक्षा दलाच्या नजरेतून बचाव करत कोणत्या मार्गाने तळावर घुसता येईल, याची माहिती अतिरेक्यांना दिली होती. त्याच मार्गाचा वापर अतिरेक्यांनी दारुगोळा, स्फोटके, ग्रेनेड, शस्त्रे आणि एके-47 रायफल लपवून ठेवण्यासाठी केला होता. हे दावे पत्रकार एड्रियन लेवी आणि कॅथी स्कॉट क्लार्कने आपले पुस्तक 'स्पाय स्टोरीज: इनसाइड द सिक्रेट वर्ल्ड ऑफ द रॉ अॅन्ड आयएसआय' (SPY STORIES : Inside the Secret World of the R.A.W. and the I.S.I.) मध्ये केले आहेत.
2 जानेवरी 2016 रोजी भारतीय सेनाच्या पोषाखात अतिरेक्यांनी भारत-पाकिस्तान पंजाब सीमेवरील रावी नदीतून भारतीय हद्दीत प्रवेश केला. येथून त्यांनी काही गाड्या ताब्यात घेत, पठाणकोट हवाईदलाच्या तळाच्या दिशेने रवाना झाले. हवाईदलाच्या तळावर घुसून त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. यात तीन जवान शहिद झाले. तर यात चार अतिरेक्यांना जवानांनी ठार केले. या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा एक आयडी स्फोट झाला. या स्फोटात भारताचे आणखी चार जवान शहिद झाले. या हल्ल्याने एकच गोंधळ उडाला. परिस्थिती आपल्या नियंत्रणात आली की नाही, हेच सुनिश्चित करण्यास लष्काराला तीन दिवस लागले.
इशाऱ्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा -
लेखकांनी म्हटले आहे, की पठाणकोट हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तावर दबाव निर्माण करत युद्धाची धमकी दिली होती. पठाणकोठ हल्ल्याचा रिपोर्ट अत्यंत प्रामाणिकपणे तयार करण्यात आला होता. सतत मिळालेल्या इशाऱ्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत चूक झाल्याचे अहवालात कबूल करण्यात आले होते. पंजाब 91 किमी सीमेवर कुंपन घालण्यात आले नाही. तसेच जवळपास चार ते पाच रिपोर्टमधून नदी आणि कोरडे नाले संवेदनशील स्थळ असल्याची सांगण्यात आले होते. मात्र, त्यावर जाळे लावण्यात आले नव्हते. सहा लिखित अहवाल दिल्यानंतरही अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली नव्हती. तसेच दहशतवादी हालचालींवर पाळत ठेवण्याचे तंत्रज्ञान आणि ट्रॅकिंग उपकरणे तैनात केली गेली नव्हती.
विस्फोटकाची खरेदी भारतातून -